Dividend Stocks: आरबीआयनं काल रेपो रेटमध्ये (RBI Repo Rate) फारसा बदल केला नाही त्यामुळे इएमआय आणि कर्जात फारसा बदल झालेला नाही. त्यातून शेअर बाजारातही (Share Market) चांगली वाढ पाहायला मिळते आहे त्यामुळे सध्या गुंतवणूकदारांसाठीही दिलासा देणारा काळ आहे. शेअर मार्केट्सप्रमाणे आता डिविंडटमधूनही (Dividend News Today) तुम्ही चांगली कमाई करू शकता सध्या असाच एक डिविटंड आहे ज्यानं गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवू दिला आहे. सध्या या एका डिविटंडनं शेअरहोल्डर्सना चांगला भाव मिळवून दिला आहे. (Dividend of muthoot finance announces 22 rupees interim diviend know the record date and details share market news in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शेअरचं नावं आहे मूथुट फायनान्स (Muthoot Finance). या शेअरनं चक्क 220 टक्क्यांचा तगडा डिविडंट दिला आहे. तुम्हाला माहितीये का की हा शेअर सध्या BSE वर 2.5 टक्क्यांनी ट्रेण्ड करतो आहे. काही दिवसांपुर्वी ब्रिटानियानं गुंतवणूकदारांसाठी चांगला डिविडंट आणला होता. यामध्ये त्यांनी 7200 टक्क्यांना डिविडंट ऑफर केला होता. त्यामुळे 72 रूपये प्रति शेअर असा हा तीन वर्षांतला सर्वाधिक डिविडंट होता. त्यानंतर आता ग्राहकांसाठी या घसघशीत डिविडंटमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळाली आहे. 


जाणून घ्या 'या' डिविडंटबद्दल : 


हा शेअर 10 रूपयांच्या फेस व्हल्यूवर 22 रूपये प्रति शेअरच्या अंतरिम डिविडंट (Interim Dividend) देतो आहे. 6 एप्रिलला मूथुट फायनान्सची बोर्ड मिटिंग झाली. ज्यात या डिविडंटची एक्स डेट ही 18 एप्रिल एवढी आहे. या कंपनीनं याआधी 20 रूपये प्रति शेअरचा डिविडंट दिला होता. सध्या हा स्टॉकही फार मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटवर ट्रेण्ड होतो आहे. या कंपनीचा मार्केट कॅप हा 40,399.74 रूपये इतका आहे. तेव्हा गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी आहे. तुमच्यासाठी हा डिविंडट नक्की चांगला फायदा मिळवून देईल. तुम्ही हा स्टॉक खरेदी केला असेल तर तो विकण्याची आणि खरेदी केला नसेल तर तो खरेदी करण्याची स्ट्रेटजी ठरवा आणि तगडा नफा कमवा. 


काय आहे शेअर मार्केटची स्थिती - 


आरबीआयच्या रेपो रेटच्या निर्णयानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीवर जोरदार (Nifty) तेजी पाहायला मिळते आहे त्याचसोबतच सध्या सेन्सेक्स हा 59800 आणि निफ्टी ही 17500 च्या अंकांवर ट्रेण्ड करतो आहे. त्यातून व्याज दरांमध्ये काहीच बदल नसल्यानं सध्या शेअर मार्केटही फार चांगल्या पद्धतीनं खुला झाला आहे.