Divya Pahuja Big Mistake By Police: दिल्लीतील मॉडेल दिव्या पहुजाच्या हत्याकाडांमध्ये एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ज्या 'द सिटी पॉइण्ट हॉटेल'मध्ये दिव्याची गोळ्या घालून हत्या झाली ते हॉटेल पोलिसांनी नीट तपासलं नाही. पोलिसांनी हॉटेलची नीट पहाणी केली असती, सीसीटीव्ही फुटेज पहिल्याच फेरीत योग्य प्रकारे तपासले असते तर दिव्याचा मृतदेह आणि त्यासाठी वापरण्यात आलेलं हत्यार तिथेच सापडलं असतं. यासंदर्भातील धक्कादायक खुलासा स्वत: गुन्हे शाखेच्या डीसीपींनी केला आहे. पोलिसांना हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची ईव्हीआर घटनास्थळी पोहोचली. त्यांनी हॉटेलमधील रुम नंबर 114 तपासून पाहिला आणि ते परतले. 


पोलिसांना बहिणीचा फोन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुन्हे शाखेचे डीसीपी विजय प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या पाहुजाची बहीण नैना पाहुजाने पोलिसांना फोन केला होता. दिव्याने तिच्या शेवटच्या फोन कॉलमध्ये 'द सिटी पॉइण्ट हॉटेल'चा उल्लेख केल्याचं नैनाने पोलिसांना सांगितलं. नैना बहिणीला शोधायला या हॉटलेमध्ये गेली तर तिला आत प्रवेश नाकारण्यात आला. हा सारा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.


मृतदेह हॉटेलमध्येच होता


त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास सेक्टर-14 चे पोलीस या हॉटेलमध्ये पोहचले. त्यांनी रुम नंबर 114 तपासला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजही अगदी वर वर तपासून पहिलं. सीसीटीव्हीमध्ये दिलेली दृष्य पाहून पोलिसांना धक्का बसला. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांच्या या पहिल्या फेरीदरम्यान दिव्याची हत्या करणारा हॉटेलचा मालक तसेच प्रमुख आरोपी अभिजीत सिंहने मृतदेह हॉटेलच्या पॅसेजमधून बीएमडब्ल्यू गाडीमध्ये ठेवण्यासाठी खाली नेला होता. हॉटेलमधील कर्मचारी असलेल्या ओम प्रकाश आणि हेमराज यांनी अभिजीतला मृतदेह लपवण्यासाठी मदत केली. 


ती अज्ञात व्यक्ती कोण?


डीसीपी विजय प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत हॉटेलचा मालक असल्याने रुम नंबर 114 त्याच्यासाठी कायम बूक असायचा. मात्र 2 जानेवारी रोजी अभिजीत आणि दिव्याबरोबर आणखी एक व्यक्ती होती. त्यामुळे दिव्या आणि अभिजीत रुम नंबर 111 मध्ये होते. दुसरी अज्ञात व्यक्ती रुम नंबर 114 मध्ये होती. मात्र ही अज्ञात व्यक्ती कोण याबद्दल गुरुग्राम पोलीस काहीही बोलायला तयार नाही.


नक्की वाचा >> अश्लील फोटो दाखवून ती..; मॉडेल दिव्याच्या हत्येचं खरं कारण आलं समोर; त्या रात्री रुम नंबर 111 मध्ये...


पोलिसांनी वर वर तपास केला


पोलिसांच्या माहितीनुसार, अभिजीतने 2 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजता दिव्याच्या कपाळावर मध्यभागी गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर नशेत असलेला अभिजीत हॉटेलच्या रिसेप्शनवर पोहोचला. त्याने अनुप नावाच्या व्यक्तीला पोलिसांना फोन करुन मृतदेह रुम नंबर 114 मध्ये असल्याचं सांग असं सांगितलं. अनुपने पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन औपचारिकता म्हणून रुम तपासली आणि ते तसेच माघारी फिरले. पोलिसांनी अनुपकडे पहिल्यांदाच नीट चौकशी केली असती, सीसीटीव्ही पाहिले असते तर दिव्याचा मृतदेह आणि हत्येसाठी वापरलेली बंदूक सापडली असती कारण मृतदेह तेव्हा हॉटेलच्या आवारातच होता. 


मृतदेहाची विल्हेवाट


अभिजीतने पोलीस गेल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं नियोजन केलं. त्याने दिल्लीतील साऊथ एक्समधील बलराज गिल आणि हिसारमधील रवि बांगा या दोघांना मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सोपवली. यासाठी त्यांना मृतदेह ठेवलेल्या बीएमडब्ल्यू कारची चावी आणि 10 लाख रुपये दिले.