Divya Pahuja Murder Case: मॉडेल दिव्या पहुजाच्या हत्याकाडांमुळे दिल्लीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गुरुग्राममधील कुख्यात गँगस्टर संदीप गडोलीची गर्लफ्रेंड अशी ओळख असलेल्या दिव्याची गुरुग्रामधील हॉटेलमध्ये 2 जानेवारी रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय दिव्याचा मृत्यू संक्षयास्पद स्थितीमध्ये हॉटेलमध्येच झाला. दिव्याही हत्या केल्याप्रकरणी या हॉटेलचा मालक असलेल्या अभिजित सिंहला अटक करण्यात आली आहे. तसेच अभिजितला मदत करणाऱ्या ओम प्रकाश आणि हेमराज यांनाही अटक करण्यात आली आहे. असं असलं तरी अद्याप दिव्याचा मृतदेह पोलिसांना सापडलेला नाही. या हत्येमागील धक्कादायक कारणाचा खुलासा आरोपींनी केला आहे.


सीसीटीव्हीमध्ये कैद झाला घटनाक्रम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी अभिजीतने काही सहकाऱ्यांच्या मदतीने दिव्याचा मृतदेह बीएमडब्ल्यू कारमध्ये भरल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. दिव्या ही नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी या हॉटेलमध्ये आली होती. गँगस्टर संदीप गडोली हा दिल्ली-एनसीआरमध्ये कुप्रसिद्ध आहे. दिव्या संदीपची गर्ल्डफ्रेण्ड होती. मात्र तिची हत्या तिच्या मित्राने हॉटेल रुममधील केल्याचा पोलिसांचा दावा आहे. तिचा हा मित्र म्हणजे हॉटेलचा मालक अभिजीतच असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आे. दिव्याचा मृतदेह दुसऱ्या राज्यात नेऊन त्याची विल्हेवाट लावल्याचं सांगितलं जात आहे.


मुंबईमध्ये 2016 पासून होती तुरुंगात


दिव्याचं नाव एका हत्या प्रकरणामध्ये होतं. मुंबईमध्ये काही काळ तुरुंगवासात राहिल्यानंतर जुलै 2023 रोजी जामीन मिळाल्यानंतर दिव्या तुरुंगातून बाहेर आली होती. 2016 साली मुंबईतील हॉटेलमध्ये गँगस्टर संदीप गडोलीचा एन्काऊंटर झाल्यानंतर दिव्याला अटक करण्यात आली होती. 


हत्या का केली?


दिव्याची हत्या करणाऱ्या अभिजीतने प्राथमिक तपासामध्ये दिलेल्या माहितीनुसार, ज्या हॉटेल सिटी पॉइण्टमध्ये दिव्याची हत्या झाली ते हॉटेल अभिजीतने करारावर घेतलं आहे. दिव्याकडे अभिजितचे काही अश्लील फोटो होतो. हे फोटो दाखवून दिव्या अभिजीतला ब्लॅकमेल करत होती. दिव्या अनेकदा खर्चासाठी लागणारा पैसा खंडणी स्वरुपात अभिजीतकडून घ्यायची. अभिजीतचे अश्लील फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देत दिव्याने अनेकदा त्याच्याकडून पैसे घेतले होते आणि आता पुन्हा त्याच्याकडून फार मोठी रक्कम घेण्याचा दिव्याचा विचार होता. 2 जानेवारीला अभिजीत आणि दिव्या एकत्रच हॉटेलमध्ये आले होते.


त्या रात्री रुम नंबर 111 मध्ये काय घडलं?


दिव्याने तिच्या फोनमधील आपले फोटो डिलीट करावे अशी अभिजीतची इच्छा होती. त्याने तिचा फोन घेऊन फोटो डिलीट करण्याचा प्रयत्न केला मात्र दिव्या त्याला फोनचा पासवर्ड सांगत नव्हती. त्यामुळे अभिजीतने संतापून दिव्यावर गोळीबार करुन तिची हत्या केली. यानंतर हॉटेलमध्ये स्वच्छता कर्मचारी आणि रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या हेमराज आणि प्रकाशने दिव्याचा मृतदेह कारमध्ये ठेवण्यास अभिजीतला मदत केली. त्यानंतर अभिजीतने अन्य दोघांना फोन करुन आपली कार त्यांच्या ताब्यात देत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितलं. हॉटेलमधील रुम क्रमांक 111 रक्ताने माखलेला पोलिसांना आढळून आल्यानंतर पोलिसांकडून अभिजीतला अटक करण्यात आली.