Bhaubeej 2022 Muhurat : उद्या भाऊबीज आहे, बहीण भावाच्या नात्यातील सर्वात पवित्र दिन. कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज (Bhaubeej) साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीयाही म्हटलं जातं. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले.या दिवशी भाऊ बहीण एकत्रपणे हा सण साजरा करत असतात,बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला तिच्या आवडीची एखादी गोष्ट भेट म्हणून देतो. दिवाळी सणात भाऊबीज खरतर चार चांद लावतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.  (diwali 2022 fashion this festival season make ur top as blouse and wear saree and look beautifull )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सणासुदीला नटून थटून फिरायला कोणाला आवडत नाही. आतापर्यंत जवळपास सर्व महिला वर्गाने या भाऊबीजेला काय ड्रेसिंग करायचं याच प्लॅनिंग केलं असेलच तशी खरेदीसुद्धा झाली असणार.


सणवार म्हटले कि आपल्याकडे साडी नेसणं आवर्जून येतच. पण बऱ्याचदा असं होत कि, आपल्याला साडी नेसायची असते पण ऐन वेळी ब्लाउज होत नाही किंवा ब्लाउज मॅच (maching blouse) होत नाही काहीतरी घडत आणि आपला मूड ऑफ होतो पण आता यावर एक सोल्युशन सापडलं आहे. (diwali 2022 fashion this festival season make ur top as blouse and wear saree and look beautifull )


हे काही ऑप्शन आहेत ज्यात तुमच्याकडे ब्लाउज नसेल तरी तुम्ही साडी नेसू शकता आणि या फेस्टिवल सिजनमध्ये सर्वात उठून दिसू शकता.  


ब्लॅक क्रॉप टॉप (black crop top)
फ्लोरल प्रिंटची साडी असो किंवा सिल्कची साडी, ती ब्लॅक क्रॉप टॉपवर सहज मॅच करता येते. क्रॉप टॉप साड्यांसोबत सहज मॅच होतात. . फक्त मॅचिंग  दागिने आणि परफेक्ट मेकअप  करायला विसरू नका.  ब्लॅक क्रॉप टॉप कोणत्याही साडी किंवा लेहेंग्यासोबत मॅच करता येतो. 


रफल टॉप (ruffle top)
साडीसोबत मॅचिंग ब्लाउज नसल्यास रफल टॉपसह फ्युजन लूकमध्ये साडी नेसू  शकता. कोणत्याही रफल डिझाइन टॉपला साडीसोबत मॅच करा . हे खूप वेगळे दिसेल आणि स्टायलिश देखील दिसेल.


पफ स्लीव्ह टॉप (puff sleeves top)
पफ स्लीव्ह डिझाईन असलेले टॉप्सही साड्यांसोबत मॅच करता येतात. हा एक अतिशय चांगला पर्याय आहे. जर तुमचे हात जाड किंवा पातळ असतील तर अशा प्रकारच्या स्लीव्ह डिझाइनमुळे तुम्हाला सुंदर लुक मिळेल.


टॅंक टॉप (tank top)
कोणत्याही साडीला काळ्या रंगाच्या टँक टॉपसोबत मॅच करा. ते स्टायलिश दिसेल आणि तुम्हाला वेगळे बनवेल. विशेषत: काळ्या रंगाचे टँक टॉप्स साडीसोबत सहज मॅच करतात. त्यामुळे या दिवाळीत साडी नेसण्याचा बेत सोडण्याऐवजी यापैकी कोणत्याही टॉपशी साडी मॅच करा. तुम्हाला पूर्णपणे वेगळा लुक मिळेल.