मुंबई : घर खरेदी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. व्यक्ती नोकरी करणारी असो की मग ती व्यवसायिक असो. राहण्यासाठी हक्काची जागा म्हणून खरेदी केलं जातं तर काही वेळा गुंतवणूक (Investment) म्हणून घराची खरेदी केली जाते. सणासुदीच्या हंगामात अनेक बिल्डर्स आणि बँकांकडून घर खरेदी करण्यासाठी विविध आकर्षक योजना राबवल्या जातात. यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला होमलोनसाठी (Home Loan) महत्वपूर्ण ठरणाऱ्या '5x20/30/50' फॉर्म्युल्याबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया...


असं करा '5x20/30/50' ने कॅलक्युलेशन...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बजेट ठरवताना '5x20/30/50' या फॉर्म्युल्याला खुप महत्व आहे. हा फॉर्म्युला तुमच्या इनकम, खर्च आणि तुमच्या सेविंग्समध्ये संतुलन ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरतो. घर खरेदी करण्यासाठी तुम्ही या फॉर्म्युल्याचा वापर करु शकता.


'5x20/30/50' हा फॉर्म्युला कसा काम करतो?


1. या '5x20/30/50' फॉर्म्युल्यामध्ये असणारा 5 हा अंक म्हणजे जे घर तुम्ही खरेदी करण्याचा प्लान करत आहात त्याची किंमत तुमच्या अ‍ॅन्यूअल सॅलरीच्या पाच पटीपेक्षा जास्त नसावा.


2. या फॉर्म्युल्यामध्ये असणारा 20 हा अंक म्हणजे घर खरेदी करण्यासाठी तुम्ही जे लोन घेत आहात, त्याचा टेन्यूअर 20 वर्षांपेक्षा जास्त नसावा.


3. या फॉर्म्युल्यामध्ये असणारा 30 हा अंक म्हणजे घर खरेदी करताना महिन्याला भरलाजाणारा EMI हा तुमच्या मंथली सॅलरीच्या 30% पेक्षा जास्त नसावा. 


4.  या फॉर्म्युल्यामध्ये असणारा 50 हा अंक म्हणजे तुमचा एकुण EMI म्हणजेच होम लोनशिवाय तुम्ही इतर जे EMI भरत असाल तर सर्व मिळून तुमच्या मंथली सॅलरीच्या 50% टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.