मुंबई : दिवाळी काही दिवसांवर आली आहे.  अशा परिस्थितीत लोकांनी आपली घरे साफ करणे आणि खरेदी करणे सुरू केले आहे. दिवाळीच्या निमित्ताने लोक घराच्या सजावटीकडे विशेष लक्ष देत आहेत. दिवाळीसाठी लोकं भरपूर पैसा खर्च करतात. दिवाळीला काही लोकांच्या घरी रंगरंगोटीचं काम सुरु आहे. नवीन पडदे आणि नवीन बेडशीटपासून सजावटीपर्यंत सर्व काही खरेदी करणं सुरु आहे. पण तुमचे बजेट कमी असले तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण कमी बजेटमध्येही तुम्ही तुमचे घर अतिशय सुंदरपणे सजवू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीसाठी घर कसे सोप्या पद्धतीने सजवायचे ते सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही कमी बजेटमध्येही तुमचे सुंदर घर दिवाळीसाठी परिपूर्ण बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया दिवाळीच्या सजावटीच्या टिप्स.


दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्हाला तुमच्या बाल्कनीला काही नवीन लूक द्यायचा असेल, तर तुम्ही बाल्कनीला दिवे लावून सजवू शकता. तुम्हाला बाजारात सर्व प्रकारच्या रेंजमध्ये रंगीबेरंगी दिवे मिळतील. तुम्ही तुमच्या बजेटनुसार दिवे खरेदी करू शकता. दिव्यांच्या प्रकाशाने तुमची बाल्कनी चमकू लागेल.


दिवाळीसाठी विविध रंगीबेरंगी आणि डिझाइन केलेले दिवे बाजारात उपलब्ध आहेत. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही प्लेन दिव्यांना घरी रंग देऊ शकता. याच्या मदतीने साधे दिवे देखील वेगळे आणि सुंदर दिसतील.


दिवाळीत प्रत्येक घरात रांगोळी काढली जाते. हे अत्यंत शुभ मानले जाते. यासोबतच दिवाळीला घर सजवण्यासाठीही हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही दिवाळीला वेगवेगळ्या रंगांनी सुंदर रांगोळी काढू शकता आणि रांगोळीभोवती फुलांनी सजवू शकता.


दिवाळीत तुम्ही काचेच्या वाट्याही सजवू शकता. तुम्ही एका काचेच्या भांड्यात पाणी भरा. नंतर त्यावर लाल, पिवळी, पांढरी अशी कोणत्याही रंगाची फुले घाला. त्यावर तुम्ही फ्लोटिंग मेणबत्ती पेटवू शकता. तुम्ही ते सेंटर टेबल, डायनिंग टेबल किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवू शकता. ते तुमच्या घराला खूप सुंदर लुक देईल.