Dhanteras 2020च्या दिवशी काय आहेत सोन्या- चांदीचे दर?
खरेदी करण्यासाठी जाण्यापूर्वी एकदा घ्या दरांचा अंदाज
मुंबई : Diwali 2020 च्या दिवसांमध्ये धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांमध्ये होणारे चढ उतार अनेकजण पाहत आहेत. पण, तरीही सोनं खरेदीसाठी किंवा चांदीची एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी पुढं येणाऱ्यांची संख्याही कमी नाही. सोन्याच्या दरांमध्ये सातत्यानं होणारे चढ उतार पाहता शुक्रवारी यावर अनेकांचीच नजर राहिली. वायदा बाजारात सोन्याच्या दरांमध्ये काहीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
एमसीएक्स MCX वर सोन्याचे भाव ५०,६९० आणि ५०,०२२ इतक्या दरांवर ट्रेंड करत होते. तर, चांदीच्या दरांत काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीचे दर प्रतिकिलो ६२,५२० रुपये इतके असल्याचं पाहायला मिळालं. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सोन्याच्या दरांमध्ये कमालीची सुधारणा पाहायला मिळाली.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोनं आणि चांदीच्या खरेदीमध्येही वाढ होण्याची चिन्हं आहेत. सोनं खरेदीसाठी ग्राहकांची एकूण आकडेवारी समाधानकारक आहे. मुख्य म्हणजे खरेदीसाठीचे आकडे मागील वर्षांचा टप्पा गाठणार नाहीत ही बाबही लक्षात घेण्याजोगी आहे; असं वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलचे कार्यकारी संचालक सोमासुंदरम पीआर यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत सांगितलं.
आज धनत्रयोदशी. आजच्या दिवशी सोने-चांदीची खरेदी केली जाते. आजचा दिवशी पूजा देखील केली जाते.