Credit Card Interest : सणासुदीच्या काळात (Credit Card Offer) खूप खरेदी केली जाते. क्रेडिट कार्डचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे कॅश एडव्हान्सची सुविधा. मात्र, आजकाल ऑनलाईन शॉपिंग क्रेडिट कार्ड ऑफरमुळे लोकांना जास्त पैसे काढण्याची गरज नाही. पण तरीही अनेक लोक एटीएममधून पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करतात. कारण अनेक जण ऑफर्ससाठी जास्त खर्च करतात. अशा परिस्थितीत लोकांनी त्यांच्या क्रेडिट कार्डमधून पैसे काढणे योग्य आहे का? तज्ज्ञांच्या मते असं करणे योग्य आहे की अयोग्य? यामुळे भविष्यात तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं का? (do not use cash from atm using credit card else 2 or 3 percent withdrawal charge) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या मते, एटीएममधून क्रेडीट कार्डमधून पैसे काढणं टाळलं पाहिजे. याचं कारण म्हणजे बँक पैसे काढण्यावर भरपूर व्याज आणि शुल्क आकारते. याशिवाय क्रेडिट कार्डधारकाने किमान रक्कम भरली नाही तर त्याच्या CIBIL स्कोअरवरही परिणाम होतो. क्रेडीट कार्डमधून पैसे काढल्यास 2.5 टक्के ते 3 टक्के रोख पैसे काढण्याचे शुल्क आकारले जाते. याशिवाय, तुम्ही जितके दिवस पैसे जमा करत नाही तितक्या दिवसांसाठी शुल्क देखील दररोज जोडले जाते.


4 टक्के व्याज


याशिवाय दरमहा 4 टक्के व्याज भरावे लागेल. त्यानुसार व्याजाव्यतिरिक्त अनेक प्रकारचे शुल्क देखील भरता. याशिवाय कार्डमधून रोख रक्कम काढून पेमेंट केल्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत. व्याज व्यतिरिक्त बँक तुमच्याकडून रोख पैसे काढण्याचे शुल्क देखील आकारते. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे अॅक्सिस बँकेचे फ्लिपकार्ट क्रेडिट कार्ड असेल, जर तुम्ही त्यातून पैसे काढले तर बँक तुमच्याकडून पैसे काढण्यासाठी 500 रुपये किंवा 2.5 टक्के शुल्क आकारेल. याशिवाय वार्षिक आधारावर 50 टक्क्यांहून अधिक व्याज आकारले जाईल. अशा परिस्थितीत तुम्हाला हजारो रुपये शुल्क भरावे लागू शकते.       


सिबिल स्कोरवर परिणाम


जर तुम्ही क्रेडिट कार्डमधून पैसे काढले तर त्याचा सिबिल स्कोअरवर वाईट परिणाम होतो. यामुळे बँकांना वाटते की तुमची आर्थिक स्थिती खूप वाईट आहे.  यामुळे तुम्ही कधीही एटीएममधून पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरू नका.