मुंबई : आजकाल ऑनलाईन बँकिंगच्या व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. लोक ऑनलाइन पैसे एकमेकांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करीत असतात. यासाठी आयएफएससी (IFSC) कोडची गरज पडते. ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही चुकीचा आयएफएससी कोड नमूद केल्यास काय होईल जाणून घ्या.


काय असतो आयएफएससी को़ड ? (Indian Financial System Code)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयएफएससी कोड 11 डिजिटचा तसेच अल्फा - न्यूमरिक कोड असतो. हा कोड रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून जारी केला जातो. हा कोड प्रत्येक बँकेच्या ब्रॅंचला दिला जातो. म्हणजेच प्रत्येक ब्रँचचा आयएफएससी कोड वेगळा असतो. आयएफएससी को़डचा वापर करून ऑनलाइन बँकिंग जसे की, NEFT,  IMPS आणि RTGS मध्ये करीत असतो. 


अचुक आयएफएससी शिवाय तुम्ही इंटरनेट बँकिंग किंवा फंड ट्रान्सफर करू शकत नाही. 11 डिजिटचा कोडच्या सुरवातीला 4 डिजिट बँकेला रिप्रेझेंट करतात. 


चुकीचा आयएफएससी कोड नमूद केल्याने तुमचा व्यवहार चुकू शकतो. व्यवहार करताना आयएफएससी को़ड अचूकच नमूद करणे गरजेचे असते. 


उदा. तुमचे खाते एसबीआय बँकेच्या दिल्ली ब्रँचमध्ये असल्यास ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही ग्रेटर नोएडाच्या एसबीआय ब्रॅंचचा कोड नमूद केला. तर तो व्यवहार होईल आणि तुमच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर होतील.


जर कोडचे अक्षर चुक आहेत परंतू अकाउंट डिटेल्स योग्य आहेत तरी तुमच्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर होतील. कारण सिस्टिम मुख्यतः बँकेचे अकाउंट नंबर पाहते.


दुसऱ्या बँकेच्या आयएफएससी कोडबाबत


जर आयएफएससी कोडमध्ये चुक झाली. उदा. जर एसबीआय गाजियाबादच्या जागी PNB गाझिबादचा कोड नमूद झालास तुमचे पैसे चुकीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होण्याची शक्यता असते. 


हे तेव्हा शक्य असते जेव्हा पीएनबीच्या एखाद्या ग्राहकाचा अकाउंट नंबर आणि तुम्ही नमूद करू इच्छित असलेल्या एसबीआयच्या अकाउंटचा नंबर सारखा असेल. 


साधरणतः अशी शक्यता खुपच कमी असते. त्यामुळे चुकीचा आयएफएससी नंबर नमूद झाल्यास व्यवहार रद्द होतो.


IFSC, IFSC Code, Online Transaction, Knowledge, SBI, Online Banking,