cyrus mistry accident news: सायरस मिस्त्री यांचं आज अपघातात निधन (cyrus mistry killed in Road accident) झालं आहे. सायरस मिस्‍त्री टाटा समुहाचे (Tata Group) माजी चेअरमन होते. टाटा समूहाने त्यांना चेअरमन पदावरून हटविले होते. त्यानंतर पुन्हा रतन टाटा (Ratan Tata) यांनी सूत्रे हाती घेतली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायरस मिस्त्री आणि घराणं 


सायरस मिस्त्री हे काही साधंसुधं नाव नाहीये हे आपण जाणतोच पण त्यांचं घरं त्यांच्या फॅमिलीविषयी जाणून घेऊया  सायरस हे साध्यासुध्या घरातले न्हवते तर भारतीय वंशांचे उद्योजक शापूरजी पालोनजी  यांचे ते छोटे पुत्र होते .अतिशय मोठ्या घराण्यात त्यांचा जन्म झाला ,पालनजी शापूरजी यांनी एका आयरिश महिलेशी लग्न केले होते आणि त्यानंतर आयर्लंडच नागरिकत्व स्वीकारलं होत ,सायरस मिस्त्री यांचा जन्म सुद्धा आयर्लंड मध्येच झाला . 


सायरस मिस्त्री यांच्या बहिणीचं लग्न रतन टाटा यांच्या... 


पालोनजी शापूरजी याना सायरस आणि शापूर ही दोन मूलं आहेत . लैला आणि अल्लू या दोन मुली आहेत यापैकी अल्लू या मुलीच लग्न नोएल टाटा यांच्याशी झालं . नोएल टाटा म्हणजे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ..एकूणच मिस्त्री आणि टाटा कुटुंब यांचे जुने आणि घनिष्ठ  संबंध आहेत . 


लंडन मध्ये झालं शिक्षण 
सायरस मिस्त्री यांचं लंडनमध्ये शिक्षण झालं आहे लंडन स्कूल ऑफ बिजिनेस म्हणून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं होत .