मुंबई : आपल्या सगळ्यांना आयुष्यात एकदा तरी मुंगी चावली असेल. इवलीशी ही मुंगी भल्याभल्यांना महागात देखील पडते आणि याबाबत आपण अनेक कहाण्या देखील ऐकल्या आहेत. मुंगीच्या चावण्याने आपल्या अंगावर मोठ-मोठ्या दादी उठतात. ज्यामुळे आपण त्रस्त होतो. परंतु आपल्या सगळ्यांना कडकडू चावणाऱ्या मुंगीबाबात एक गोष्ट फार कमी लोकांना माहित असेल. ज्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मुंग्या या सगळ्यात मेहनती असतात, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु तुम्हाला माहितीय का की, त्या आजारी देखील पडतात. आता आजरी पडल्यावर त्या बऱ्या कशा होतात? त्यांच्याकडे डॉक्टर असतो का? असा प्रश्न देखील उद्भवतो. तर मुंग्यांच्या डॉक्टर त्या स्वत: असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंग्याच्या आजाराबाबत समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन केले. संशोधनात मुंग्यांशी संबंधित अनेक गोष्टी समोर आल्या. जसे  ते कधी आजारी पडतात आणि त्या आजाराचा सामना करण्यासाठी ते काय करतात. मुंग्या रोगाचा पराभव कसा करतात हे जाणून घेऊया


एका अहवालानुसार, मुंग्या बुरशीमुळे आजारी पडतात. जेव्हा जेव्हा मुंगी ब्युवेरिया बेसियाना नावाच्या बुरशीला स्पर्श करतात तेव्हा त्या आजारी पडतात, ज्यामुळे त्या सुस्त देखील होतात.


बुरशीजन्य संसर्ग दूर करण्यासाठी मुंग्या स्वत:च विशेष प्रकारचे रसायन शोधतात. त्याचे नाव आहे हायड्रोजन पेरोक्साइड. हे रसायन दोन गोष्टींमध्ये मुग्यांना आढळते. एक म्हणजे, फुलांचा रस आणि दुसरा मध दव.


मध दव एका विशिष्ट प्रकारच्या कीटकापासून येतो. जे वनस्पतीच्या जवळ आढळतात. परंतु याच गोष्टी मुंग्यांना बरं व्हायला मदत करतात. यामुळेच जेव्हा मुंग्या आजारी पडतात, तेव्हा त्या स्वत:चं अन्न स्वत: शोधतात.


शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की मुंग्या संसर्गावर मात करण्यासाठी फुलांचा रस पिणे पसंत करतात, कारण त्यात हायड्रोजन पेरॉक्साइड जास्त असते. ज्यामुळे त्यांना बरं होण्यात मदत होते.