एखाद्याच्या मृत्यूनंतर RIP का लिहिलं जातं? त्याचा खरा अर्थ तुम्हाला माहितीय?
हा शब्द कसा बरोबर पद्धतीने लिहिला गेला पाहिजे हे जाणून घेऊया.
मुंबई : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आपण त्याच्यासाठी 'RIP' हा शब्द वापरतो. आपल्याला हे तर माहित आहे की, व्यक्ती हे जग सोडून गेल्यानंतर आपण 'RIP' हा शब्द बोलतो, परंतु तो का बोलला जातो? याचा संपूर्ण अर्थ काय हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नसतं. तर आज आम्ही याशब्दाचा अर्थ आणि तो का बोलला जातो, हे सांगणार आहोत. याशिवाय हा शब्द कधी आणि कसा सुरू झाला, याबद्दलही माहिती देणार आहोत. तसेच हा शब्द कसा बरोबर पद्धतीने लिहिला गेला पाहिजे हे देखील आम्ही सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही पुढच्यावेळेला यासंदर्भत कोणतीही चूक करणार नाही.
बरेच लोक RIP ला 'Rip' लिहितात, परंतु तुम्हाला माहितीय 'Rip' हा शब्द पूर्णपणे चूकीचा आहे कार 'Rip' 'रिप' म्हणजे कट करणे. त्यामुळे असं कधीही लिहू नका.
RIP हा एक संक्षिप्त रूप आहे. त्याचा पूर्ण अर्थ 'रेस्ट इन पीस' असे आहे. आपण या संपूर्ण शब्दाचा शॉर्टफॉर्म RIP लिहितो म्हणून त्याचे प्रत्येक इनिशियल कॅपिटल लेटर्स असावे.
रेस्ट इन पीस या शब्दाचा उगम लॅटिन भाषापासून झाला आहे आणि याला 'Requiescat In Pace' असे म्हणतात. Requiescat In Pace म्हणजे 'शांततेने झोपणे'. या शब्दाचा हिंदीतील संदर्भ असा होतो की, 'आत्म्यास शांती मिळो'.
ख्रिस्ती धर्मात असे मानले जाते की, मृत्यूनंतर 'आत्मा' शरीरापासून वेगळा होतो आणि 'जजमेंट डे'च्या दिवशी दोघे पुन्हा एकत्र येतील.
अठराव्या शतकाची सुरुवात!
Requiescat In Pace बद्दल असे म्हटले जाते की, चर्चच्या शांततेत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याचा आत्मा येशू ख्रिस्ताशी जुळतो. RIP या शब्दाचा वापर 18 व्या शतकातील असल्याचे मानले जाते. याआधी 5 व्या शतकात मृत्यूनंतरच्या थडग्यांवर 'Requiescat in Pace' असे शब्द लिहिले गेले आहेत. ख्रिश्चन धर्मात या शब्दाचा वापर वाढला. यानंतर हा शब्द जागतिक झाला आहे.