जगातील Top 12 देश, जिथे Income Tax भरावा लागत नाही, तुम्हाला माहिती आहेत का?
Income Tax हा कोणत्याही देशाचा उत्पन्नाचा मुख्य स्तोत्र असतो. फक्त भारताबद्दल बोलायचं गेल्यास येथे प्रत्येकाच्या उत्पन्नानुसार कर आकारला जातो. म्हणजेच जो कमी कमावतो त्याला कमी करत भरावा लागतो. याउलट ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्याच्या कराची रक्कमही जास्त असते. पण तुम्हाला माहिती आहे का, जगात असे अनेक देश आहेत जिथे कर वसूल केला जात नाही.
Tax Free Countries: जगातील अनेक देशांचा आयकर (Income Tax) हाच उत्पन्नाचा मुख्य स्तोत्र असतो. वेगवेगळ्या देशांमध्ये नागरिकांकडून अनेक प्रकारचे कर आकारले जातात. मात्र यामध्ये लोकांच्या उत्पन्नावर आकारला जाणार कर सर्वात महत्त्वाचा असतो. भारतसह अनेक देशांमध्ये नागरिकांना आयकराच्या रुपात मोठी रक्कम भरावी लागते. पण तुम्हाला माहिती आहे का, जगात काही असे देशही आहेत जिथे आयकर आकारला जात नाही. या देशांमध्ये UAE आणि Oman यांचाही समावेश आहे.
द बहामास
पर्यटकांसाठी जन्नत म्हटलं जाणाऱ्या द बहामास (The Bahamas) येथे नागरिकांना आयकर भरावा लागत नाही.
संयुक्त अरब अमिराती
संयुक्त अरब आमिराती (UAE) श्रीमंत देशांपैकी एक आहे. युएईची अर्थव्यवस्था तेल आणि पर्यटनामुळे भक्कम स्थितीत आहे. यामुळे तेथील नागरिकांना आयकर भरावा लागत नाही.
बहरीन
बहरीनमधील (Bahrain) नागरिकांनाही आपल्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही. बहरीनमधील सरकारकडून जनतेवर कोणताही कर भार लादला जात नाही.
ब्रुनेई
तेलाचे साठे असलेले ब्रुनेई (Brunei) दक्षिण पूर्व आशियामध्ये आहे. येथे लोकांना कोणत्याही प्रकारचा आयकर भरावा लागत नाही.
केमैन आयलँड्स
केमन आयलँड्स (Cayman Islands) देश उत्तर अमेरिका खंडातील कॅरिबियन प्रदेशात येतो. हे पर्यटकांसाठी आणि सुट्टीसाठी आकर्षक ठिकाण आहे. या देशातही कोणताही आयकर भरावा लागत नाही.
कुवैत
आखाती प्रदेशातील प्रमुख तेल निर्यात करणारा देश कुवैतमध्ये (Kuwait) बहरीनप्रमाणेच नागरिकांकडून कोणताही आयकर आकारला जात नाही.
ओमान
बहरीन आणि कुवैतप्रमाणे आखाती देश ओमानही (Oman) या यादीत सहभागी आहे. ओमानमधील नागरिकांना आयकर भरावा लागत नाही. ओमान तेल आणि गॅस क्षेत्रासाठी ओळखलं जातं.
कतार
ओमान, बहरीन आणि कुवैतप्रमाणे कतारमध्येही (Qatar) सारखीच स्थिती आहे. तेलामुळे कतारचीही आर्थिक स्थिती भक्कम आहे. हा देश छोटा असला तरी येथील नागरिक मात्र श्रीमंत आहेत. येथेही नागरिकांकडून आयकर आकारला जात नाही.
मालदीव
मालदीव (Maldives) हे पर्यटकांसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. जगभरातून लोक मालदीवला येत असतात. पर्यटनामुळे आर्थिक स्थिती मजबूत असणाऱ्या मालदीवमध्येही आयकर आकारला जात नाही.
मोनाको
युरोपमधील मोनाको देश फार छोटा आहे. मात्र यानंतरही तेथील नागरिकांकडून आयकर वसूल केला जात नाही.
नौरु
नौरू (Nauru) जगातील सर्वात लहान बेट राष्ट्र म्हटलं जातं, ज्याचं क्षेत्रफळ फक्त 8.1 चौरस मैल आहे. नौरूमधील लोकांकडूनही आयकर वसूल केला जात नाही.
सोमालिया
सोमालिया (Somalia) देशही टॅक्स फ्री आहे. पण तेथील स्थिती इतकी वाईट आहे की, लोकांना फार सुविधा उपलब्ध नाहीत.