नवी दिल्ली - देशाच्या बाहेर जायचे असल्यास तुमच्या जवळ पासपोर्ट असणे गरजेचे असते. त्याचबरोबर व्हिसा असणेही आवश्यक असते. पासपोर्ट असताना व्हिसाची गरज का भासते? असा प्रश्न अनेकांना पडतो. काही असे देश आहेत की तिथे जाण्यासाठी अगोदर व्हिसा काढावा लागतो. पासपोर्ट हे सरकारी दस्तावेज आहे. पासपोर्टमध्ये संबधित व्यक्तीचे नाव, फोटो, नागरिकत्व, पत्ता, पालकांचे नाव, लिंग, व्यवसाय आणि इतर माहिती दिली जाते. त्यासाठी पासपोर्ट तयार करण्यासाठी मोठा कालावधी लागतो. प्रत्येक प्रक्रिया लक्षपूर्वक पार पाडली जाते. यासाठीच परदेशात महत्वाचे ओळखपत्र म्हणून पासपोर्ट स्वीकारले जाते. परंतु काही लोकांना पासपोर्ट आणि व्हिसा यातील फरक माहिती नसल्यामुळे ते गोंधळून जातात. पासपोर्ट आणि व्हिसामध्ये नेमका काय फरक असतो ते पाहूया.


 


पासपोर्टचे प्रकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


१) ऑर्डिनरी पासपोर्ट- दाट निळ्या रंगाचा असतो. यात ३० ते ६० पानं असतात. तसेच याला पी-प्रकार पासपोर्ट म्हणतात.    


२) ऑफिशियल पासपोर्ट-  हा पासपोर्ट केवळ त्या सरकारी अधिकाऱ्याला दिला जातो. जे देशाच्या बाहेर जावून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. हा सफेद रंगाचा असतो. याला एस-प्रकार पासपोर्ट म्हणतात.    


३) डिप्लोमॅटिक पासपोर्ट-  हा पासपोर्ट भारतीय डिप्लोमॅटिक आणि उच्च दर्जाचे अधिकारी यांना दिला जातो. तो हिरव्या रंगाचा असतो. याला डी-प्रकार पासपोर्ट असे म्हणतात. 


व्हिसा म्हणजे एखाद्या व्यक्तीस बाहेरच्या देशात राहण्यासाठी दिलेली परवानगी असते. जर तुम्हाला अमेरिकेला जायचे असेल तर अमेरिकेचा व्हिसा घेऊनच आपण त्या देशात जाऊ शकतो. 


 


व्हिसा देखील अनेक प्रकारचे आहेत.


 


१) टूरिस्ट व्हिसा - इतर देशामध्ये प्रवासासाठी जायचे असल्यास टूरिस्ट व्हिसा जारी केला जातो. पर्यटकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रवासी व्हिसा देणारे अनेक देश आहेत.  


२) ट्रान्झिट व्हिसा - हा एक अल्पकालीन व्हिसा आहे.


३) बिझनेस व्हिसा - हा व्हिसा व्यावसायिक हेतूंसाठी जारी केला जातो.


४) वर्कर व्हिसा - हा व्हिसा कायम कामगारांना देण्यात येतो. जेणेकरुन ते कायदेशीररित्या कार्य करू शकतील.


५) फियांसी व्हिसा -  हा व्हिसा त्याला देण्यात येतो, ज्याचा विवाह दुसऱ्या देशातील व्यक्तीशी ठरला आहे आणि त्याला या देशात जायचे आहे. जर एखाद्या व्यक्तीला भारतातील महिलेशी विवाह करायचा असेल तर त्याला हा व्हिसा देण्यात येतो.