सांगा.. माहित आहे का LKG आणि UKG चा फूल फॉर्म? अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना हे माहित नाही
LKG आणि UKG हे शब्द सर्रासपणे वापरले जातात.
मुंबई : सध्या कोरोनामुळे सर्वच ऑनलाईन झालंय. ऑफीस मीटिंग ते ऑनलाईन लेक्चर्सपर्यंत. कोरोनामुळे शाळाही ऑनलाईन झाल्या.सध्या सर्व शिक्षण ऑनलाईनच सुरु आहे. लहान मुलांना धोका नको म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यात बाळ आणि शिशु वर्गही पूर्णपणे बंद आहेत. LKG आणि UKG हे शब्द सर्रासपणे वापरले जातात. पण आपल्यापैकी किती जणांना याचं पूर्ण स्वरुप (Full Form) माहितीये. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Do you know the full form of LKG and UKG)
Lower Kindergarten असं LKG चं पूर्ण स्वरुप आहेत. या वर्गात 3-4 वर्षाचे विद्यार्थी शिकतात. तर UKG चं फूल फॉर्म Upper Kindergarten असं आहे. या वर्गात 4-5 वर्षादरम्यान बालक शिक्षण घेतात.
बालकांसाठीचं उद्यान असा Kindergarten या शब्दाचा अर्थ होय. LKG आणि UKG ला किंडरगार्टन असंही म्हटलं जातं. यामध्ये शिशू वर्गातील विद्यार्थ्यांना विविध गोष्टींची तोंडओळख करुन दिली जाते.
सर्वात आधी बालकांना Nursery, LKG वर्गात प्रवेश दिला जातो. या वर्गात विद्यार्थी एक वर्ष शिकतात. त्यानंतर या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात म्हणजे Upper Kindergarten प्रवेश मिळतो. पहिल्या इयत्तेच्या प्रवेशआधी या UKGमध्ये एक वर्ष शिक्षण घ्यावं लागतं.
संबंधित बातम्या :
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांनो सावधान, आता पोलीस थेट तुमच्या दारात
Sunny Leone च्या मोबाईलमध्ये असं काय आहे जे पाहातोय Ranvijay Singh?