मुंबई : सोशल मीडीयाचा वापर आपण मनोरंजनाबरोबरच आपल्या मित्रांसोबत गप्पा मारण्याासाठी देखील आपण करते. परंतु आता आपल्या मित्रांसोबत चॅट करण्याची पद्धत बदलली आहे. आता फक्त शब्दांच्या माध्यमातूनच नाही तर आपण हावभावाच्या माध्यमातून देखील चॅट करतो. यासाठी आपल्याला मदत मिळते ती इमोजीची


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अगदी इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडियावरही आपण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी इमोजींचा मोठ्याप्रमाणावर वापर करतो. असे म्हटले जाते की, एक चित्र हे हजार शब्दांइतके प्रभावी असते, त्याचप्रमाणे इमोजी देखील ते सहजपणे व्यक्त करते, ज्यासाठी आपल्याला शब्द टाईप करण्याची गरज नाही.


तुमच्या चॅट बॉक्समध्ये सर्व प्रकारचे इमोजी आढळतात. पण तुमच्या फोनवर इतके इमोजी आणण्याची जबाबदारी कोणाची असते? हे कोण करतं? तुम्हाला माहित आहे का?


जगातील प्रत्येक व्यक्तीच्या चॅटिंग बॉक्समध्ये इमोजी आणण्यासाठी एक महिला नेहमीच काम करत असते. त्या महिलेचे नाव जेनिफर डॅनियल्स. जेनिफर सध्या युनिकोड कन्सोर्टियमच्या इमोजी उपसमितीची प्रमुख आहे. ही संस्था प्रत्येकाच्या चॅट बॉक्समध्ये इमोजी डिझाईन करण्याचे काम करते. जेनिफर डॅनियल्स एक अमेरिकन डिझायनर आणि कला दिग्दर्शक आहेत.


3000 हून अधिक इमोजी


जेनिफर या लिंग जेंडर इक्वालिटीची पक्क्या समर्थक आहेत. त्याचा प्रभाव त्यांनी तयार केलेल्या इमोजीवरही दिसून येतो. मिस्टर क्लॉज, मिसेस क्लॉज आणि मक्स क्लॉजच्या इमोजीच्या मागे त्यांचेच विचार आहेत. आज सोशल मीडियावर 3000 हून अधिक इमोजी उपलब्ध आहेत.


अशा सेंटा इमोजी मागे काय आहे कारण?


तुम्हाला इमोजीमध्ये तीन प्रकारचे सांता मिळतील. एक पुरुष (मिस्टर क्लॉज), एक महिला (मिसेस क्लॉज) आणि एक संता ज्याला स्पष्टपणे पुरुष किंवा महिला दोन्ही समजले जाऊ शकत नाही म्हणजे मक्स क्लॉज. ज्यांना त्यांची लिंग ओळख उघड करायची नाही त्यांच्यासाठी हे इमोजी आहे. अहवालांनुसार, हा बदल करण्यात आला आहे जेणेकरून सर्व लिंगी लोकांना चॅटिंग कीबोर्डमध्ये स्थान देता येईल.


जेनिफर इमोजीवर काय म्हणतात?


अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत जेनिफरने इमोजीच्या गरजेवर म्हटले- 'मला तरी असे वाटते की,  80 टक्केपेक्षा जास्त वेळ आपण काहीही न बोलता व्यक्त होतो. तथापि, जेव्हा आपण बोलतो किंवा संवाद साधतो, तेव्हा तो साधन्याचा अनेक मार्ग आहेत. अशा वेळी आपली गोष्ट केव्हा भावना व्यक्त करण्यासाठी आपण इमोजीचा वापर करतो. ज्यामुळे समोरच्यालाही तुमच्या भावना समजतात आणि त्यासाठी शब्द टाईप करुन तुम्हाला त्रास घेण्याची गरज नाही.