मुंबई : रस्त्यावर गाडी चालवायची म्हणजे रस्त्याचे वेगवेगळे नियम तुम्हाला माहित असायला हवे. रस्त्याचे वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे नियम आहेत. परंतु आपल्याला त्यापैकी सगळेच नियम आपल्याला माहित नसतात. त्यात तुम्हाला रस्त्यांवर असलेल्या रेषांचे नियम माहित आहेत का? गाडी चालवताना तुम्ही पाहिले असेल की, रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा आखलेल्या असतात. परंतु त्या रेषा नक्की कशासाठी असतात त्या रेषांचा अर्थ बऱ्याच लोकांना माहित नसतो. त्यामुळे त्या रेषांचा नेमका अर्थ काय याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्त्यावर तुम्ही पाहिले असेल की, अनेक ठिकाणी सरळ पांढरी रेषा असते, त्यानंतर अनेक ठिकाणी रेषा तुकड्यांमध्ये बनवली जाते. तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी पिवळ्या रेषा देखील पाहायला मिळतात. बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु तुम्हाला यामागील वाहतूक नियम सांगणार आहोत.


पूर्ण पांढरी रेषा - एक पूर्ण पांढरी रेषा म्हणजे तुम्ही लेन बदलू शकत नाही आणि तुम्हाला फक्त एकाच दिशेने गाडी चालवावी लागेल. तसेच काहीवेळा ही रेषा तो रस्ता दुतर्फी असल्याचे देखील सांगते.


पांढरी तुटक रेषा - पांढरी तुटक रेषा म्हणजे तुम्ही लेन बदलू शकता, म्हणजेच तुम्हाला हे करताना रस्त्यावरील साइन बोर्डला पाळावे लागेल, तसेच दुसऱ्या गाडीला तुम्ही कोणत्या बाजूला लेन बदलणार आहात याची माहिती द्यावी.


सॉलिड यलो लाईन - पिवळी रेषा म्हणजे तुम्ही ओव्हरटेक करू शकता, पण तुम्ही या पिवळ्या रेषेच्या आत असणे आवश्यक आहे


दोन पिवळ्या रेषा- याचा अर्थ असा की, आपण ज्या दिशेने चालत आहात त्या दिशेने जात रहा आणि तुम्ही आपली लेन बदलू शकत नाही.


एक सॉलिड आणि एक तुटक पिवळी रेषा- याचा अर्थ असा की, ज्या बाजूची पिवळी रेषा तुटक आहे, त्या बाजूने जाणारे लोक ओव्हरटेक करू शकतात, परंतु दुसऱ्या बाजूचे लोक तसे करू शकत नाहीत.