विमानात मिळणाऱ्या अन्नात जास्त मसाले किंवा मीठ का टाकले जाते? या मागचं खरं कारण तुम्हाला माहित आहे?
तिकिटावर अनेक हजार रुपये किंवा डॉलर्स खर्च करूनही तुम्हाला जास्त मीठाचे आणि मसाल्याचे अन्न का मिळते?
मुंबई : विमानाने प्रवास करताना तुम्ही विमानातील जेवण तर खाल्लेच असेल, त्या जेवणाची चव तुमच्या घरच्या जेवणापेक्षा खूप वेगळी असते. तिथल्या जेवणात तेलाचे प्रमाण जास्त असते, तसेच त्यात भरपूर मीठ आणि मसालेही टाकलेले असतात. त्यात तेल का जास्त वापरतात याचे नक्की कारण तर सांगू शकत नाही कदाचित ते जेवण जास्त काळ टिकून राहावे याचासाठी टाकत असावे. परंतु फ्लाइटमध्ये तुम्हाला जे जेवण दिले जाते, त्यात जास्त मीठ आणि मसाले असतात, हे कोणत्याही केटररचा दोष नसतो तर हे जाणूनबुजून केले जाते.
तिकिटावर अनेक हजार रुपये किंवा डॉलर्स खर्च करूनही तुम्हाला जास्त मीठाचे आणि मसाल्याचे अन्न का मिळते? हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
बरेच लोक विचार करतात की, एअरलाइन्स जे अन्न देतात ते बेस्वाद आणि निरुपयोगी आहे. कारण त्यात मीठ आणि मसाले भरपूर असतात. पण तसे नाही. शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही हजार फूट उंचीवर असता तेव्हा प्रत्येक गोष्टीची चव बदलते, मग तो तुमचा आवडता पास्ता असो वा वाईन.
अमेरिकन एअरलाइन्सचे इन-फ्लाईट डायनिंग आणि रिटेलचे संचालक रुस ब्राउन म्हणतात की, जेव्हा तुम्ही 30 हजार फूट उंचीवर जाता, तेव्हा सर्वात आधी तुमच्या टेस्ट बड्स प्रभावित होतात.
गोड आणि खारट यांच्यात फरक करणे कठीण
जेव्हा आपण दबाव असलेल्या केबिनमध्ये इतक्या उंचीवर बसतो तेव्हा खारट आणि गोड यांच्यात फरक करणे कठीण होते. तुमची फ्लाईट तुमच्या अन्नाची चव मोठ्या प्रमाणात प्रभावित करते.
ऑक्सफोर्ड विद्यापीठातील प्रायोगिक मानसशास्त्राचे प्राध्यापक चार्ल्स स्पेंस म्हणतात की, जमिनीच्या तुलनेत प्रत्येक प्रकारच्या खाण्यापिण्याची चाचणी हवेत खूप वेगळी असते. ते म्हणाले की याची कारणे अनेक असू शकतात जसे की, कमी आर्द्रता, हवेचा कमी दाब आणि पार्श्वभूमीतून येणारा आवाज.
आर्द्रतेचा किती परिणाम होतो?
जेव्हा तुम्ही विमानात चढता तेव्हा तुमच्या वास घेण्याची क्षमता प्रभावित होते. यानंतर, जसे विमान उंचीवर जाते, हवेचा दाब कमी होतो आणि केबिनमधील आर्द्रता देखील कमी होऊ लागते.
30 हजार फूट उंचीवर आर्द्रता 12 टक्क्यांपेक्षा कमी आहे. याचा अर्थ विमानातील केबिन वाळवंटापेक्षा जास्त कोरडी असते. कोरडेपणा आणि कमी दाबामुळे, टेस्ट बड्सची संवेदनशीलता देखील कमी होऊ लागते.
2010 मध्ये, जर्मनीच्या फ्रॉपहॉफरइन्स्टिट्यूट फॉर बिल्डिंग फिजिक्सने एक अभ्यास केला होता, ज्यात लुफ्थांसा एअरलाइन्सचाही समावेश होता.
या अभ्यासात असे म्हटले गेले की, फ्लाइटच्या आत कोरडेपणा आणि कमी दाबामुळे, खारट आणि गोड अन्नासाठी टेस्ट बड्सची संवेदनशीलता देखील 30 टक्के कमी होते. अभ्यासात समोर आले की, त्यामुळेच गोड आणि खारट चवीची संवेदनशीलता प्रभावित होते, परंतु आंबट, कडू आणि इतर मसाल्यांच्या स्वादांवर अजिबात परिणाम होत नाही.
वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम
परंतु हे केवळ टेस्ट बड्ससोबत होत नाही. 80 टक्के पेक्षा जास्त लोकांना वाटते की, फ्लाइटमध्ये प्रवास केल्याने त्यांच्या वास घेण्याच्या क्षमतेवर देखील त्याचा परिणाम होतो. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही फ्लाइट केबिनमध्ये असता, तेव्हा तुमच्या नाकात असलेल्या ग्रंथी, या वास किंवा सुगंधात फरक करण्या निष्क्रिय होतात.
म्हणूनच तुम्हाला विमानात मिळणार्या अन्न चवीत दुप्पट वाटू लागते. या कारणास्तव, एअरलाइन्स कोणत्याही रेस्टॉरंटपेक्षा जास्त मीठ आणि मसाल्यांसह अन्न देतात.