Viral News: जखमी झाल्यानंतर किंवा एखादा आजार झाल्यानंतर सर्वात प्रथम आपण डॉक्टरकडे धाव घेतो. प्रत्येक रोगावर, आजारावर डॉक्टरच योग्य सल्ला देऊ शकतात आणि उपचार करु शकतात याची जाण असल्याने आपण त्यांना देव मानतो. पण अनेकदा काही डॉक्टर मात्र या बिरुदाला पात्र ठरत नाही आणि त्यांच्यामुळे वैद्यकीय क्षेत्रावर टीका होते. अशीच काहीशी एक घटना तेलंगणात घडली आहे. जखमी अवस्थेत आलेल्या मुलावर उपचार करताना डॉक्टरने त्याच्या जखमेवर Fevikwik लावल्याची अजब आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेलंगणमधील गडवाल जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. एमबीबीएस डॉक्टरने सात वर्षाच्या जखमी मुलावर उपचार करताना त्याच्या जखमेवर फेविक्किव लावल्याने लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुलगा खाली पडल्याने जखमी झाला होता. त्याच्या डोक्यावर मार लागला होता. डॉक्टरने त्याची जखम बंद करण्यासाठी त्याच्यावर Feviquick लावून टाकलं. 


मुलाचे वडील वामसी कृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांची पत्नी सुनीता कर्नाटकमधील रायचूर जिल्ह्यात एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. यावेळी त्यांचा 7 वर्षांचा मुलगा प्रवीण चौधरीही त्यांच्यासोबत होता. लग्नाच्या ठिकाणी तो इतर मुलांसोबत खेळत होता. यावेळी खेळताना तो खाली पडला आणि कपाळावर डाव्या भुवईच्या वरती मार लागला. 


यानंतर वामसी कृष्णा मुलाला घेऊन रेन्बो रुग्णालयात गेले. येथील डॉक्टर नागार्जून याने मुलाच्या जखमेवर उपचार करताना फेविक्विक लावून टाकलं. यानंतर मुलगा वेदना वाढल्याने अजूनच रडू लागला. यानंतर ते त्याला घेऊन दुसऱ्या रुग्णालयात गेले. तिथे गेल्यावर त्यांनी डॉक्टरला आधीच रुग्णालयातील डॉक्टरने जखमेवर फेविक्विक लावलं असल्याची माहिती दिली. 


यानंतर वामसी कृष्णा आणि त्यांच्या पत्नीने रेन्बो रुग्णालयातील डॉक्टराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला. डॉक्टरच्या बेजबाबदार उपचारामुळे मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता असं त्यांनी तक्रारीत सांगितलं आहे. दरम्यान ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यानंतर अनेकांना आरोग्य विभागाकडे या संबंधित डॉक्टरविरोधात कडक कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे.