नवी दिल्ली : विजेचा धक्का लागल्यामुळे १० वर्षाच्या विरेंद्रच्या दोन्ही हाताची बोटं कापावी लागली. त्याच्या हाताचं एकही बोट वाचलं नव्हतं. त्याला पेन पकडणं देखील शक्य नव्हतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता मात्र विरेंद्रच्या पायाची बोटं त्याच्या हाताला लावण्यात आली आहेत. सफदरजंगच्या बर्न अँड प्लास्टिक डिपार्टमेंटच्या डॉक्टरांनी त्याच्या पायाची बोटं त्याच्या त्याच्या हाताला लावली आहेत.


डॉक्टरांनी आशा आहे की, आता त्याच्या दोन्ही हातांना बोटं लावल्याने त्याला पेन पकडणं ही शक्य होणार आहे. रुग्णालयात पहिल्यांदाच अशा प्रकारची सर्जरी करण्यात आली आहे. मुळचा नेपाळचा असणारा विरेंद्र याला २०१४ मध्ये विजेचा धक्का बसला होता. त्यानंतर त्याच्या बोटांना इनफेक्शन झाल्याने त्याच्या हाताची बोटं कापावी लागली होती.