मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सगळेच चिंतेत आहेत. अनेकांनी कुठेही जाण्यासाठी कारऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं आता सुरू केलं आहे. तर अनेक लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळले आहेत. ज्यामुळे बऱ्याच लोकांच्या गाड्या त्यांच्या इमारतींच्या खाली धुळ खात उभ्या राहिल्या आहेत. परंतु तुम्ही कधी असा विचार केलाय का, की तुमच्या बाईक किंवा कारमधील पेट्रोलचं कालांतराने काय होतं? ते कधी खराब होतं का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता अनेकांना हा प्रश्न देखील पडला असेल की, पेट्रोल किंवा डिझेलची कोणतीही एक्स्पायरी डेट असते का? काही वेळाने पेट्रोल आणि डिझेलही खराब होते का?  चला आपण याबद्दल एका उदाहरणा मार्फत समजून घेऊ या.


पेट्रोल आणि डिझेल हे कच्च्या तेलापासून बनवले जाते. कच्च्या तेलापेक्षा पेट्रोल किंवा डिझेल वेगाने खराब होऊ लागते. वास्तविक, पेट्रोल आणि डिझेल बनवण्यासाठी कच्चे तेल शुद्ध करताना त्यात अनेक प्रकारची रसायने मिसळली जातात. त्यात इथेनॉलही टाकले जाते. या प्रकरणात पेट्रोल आणि डिझेलचे शेल्फ लाइफ कमी होते.


जास्त वेळ वाहने उभी करून त्यात पेट्रोल टाकले तर तापमानाबरोबर काही रसायनांचे वाफेत रुपांतर होऊन पेट्रोल-डिझेल सडू लागते.


आता पेट्रोल आणि डिझेल किती वेळात खराब होते असा प्रश्न जर उपस्थीत होतो. तर हे होणं तापमानावर अवलंबून असतं, या प्रश्नावर अनेक दशके ऑटोमोबाईल वर्कशॉप चालवणारे गगन कुमार म्हणाले. तापमान असेच वाढले, तर डिझेल-पेट्रोल लवकरात लवकर खराब होऊ शकते.


अशा परिस्थितीत जर तुमची कार 1 महिना सतत उभी राहिली असेल आणि ती उन्हात उभी असेल, तर तुमच्या कारमध्ये पडलेले तेल लवकर खराब होऊ शकते.


जर गाडी 30 डिग्री म्हणजेच नॉर्मल टेम्परेचरमध्ये पार्क केली तर 3 महिने किंवा 20 डिग्री तापमान असेल, तर त्यात पडलेले ऑईल 6 महिनेही चांगले राहू शकते. तसेच हे ही लक्षात घ्या की, तुम्ही खराब झालेल्या इंधनाने गाडी चालवली तर त्याचा परिणाम इंजिनवरही होतो. यासोबतच वाहनाचा कार्बोरेटर, इंधन पंप निकामी होण्याची शक्यता असते.