Crime Viral Video: दिल्लीतील पश्चिम विहार भागातील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पाळीव कुत्रा अंगावर भुंकल्याने शेजाऱ्याने तीन जणांवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. ही घटना रविवारी घडली आहे. घटनेनंतर तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव धर्मवीर दहिया असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पीडित कुटुंबियांनी पश्चिम विहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, कुटुंबातील सदस्य बाहेर उभे आहेत. कुत्रा थोडा पुढे जाऊन थांबतो. तेव्हा एक व्यक्ती रागाच्या भरात येतो आणि हल्ला करतो. एक पुरुष आणि एक महिला त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात. या दरम्यान कुत्रा त्याच्या पायावर हल्ला करतो. त्यानंतर ती व्यक्ती कुत्र्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करतो. त्यामुळे जखमी कुत्रा जागेवर पडतो. तो इतक्यावर थांबत नाही, कुत्र्याच्या मालकावरही हल्ला करतो. 



कुत्र्याचा मालकाने सांगितले की, रविवारी सकाळी त्यांच्या शेजारी राहणारा धर्मवीर दहिया हा त्यांच्या घरासमोरून जात होता. यादरम्यान त्यांचा पाळीव कुत्रा घराच्या गेटवर बसला होता, त्यावेळी कुत्र्याने रस्त्यावरील कुत्रे आणि धर्मवीरवर भुंकण्यास सुरुवात केली. यामुळे धर्मवीर संतापला आणि त्यांनी कुत्र्याला शेपटी पकडून फेकले. धर्मवीर कुत्र्याला मारत असताना कुत्र्याने त्याला चावा घेतला होता.