Dog Sung Bhajan Video Viral On Social Media: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका भजन मंडळाचा हा व्हिडीओ आहे. एक कुत्रा चक्क भजन मंडळीसोबत बसून गाताना दिसत आहे. त्याचबरोबर सुरात सूर आळवत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओ videonation.teb नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.कुत्र्याच्या आवाजाचा हा मजेदार व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. कुत्र्याच्या गाण्याची स्टाईल सर्वांनाच आवडली.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ दत्त मंदिरातील असल्याचं बोललं जात आहे. मात्र नेमका कुठचा याबाबत अजून कळलेलं नाही. साधारणत: दोन वर्षापूर्वी चित्रित झालेला हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.