मुंबई : आपल्याला कोणताही गोष्टीची माहिती हवी असली तर बहुतेक व्यक्ती हे ती गुगलवर जावून शोधतात. अनेक गोष्टींचं योग्य उत्तर हे Google वर मिळतं. पण सगळ्याच गोष्टी या गुगलवर शोधणं कधी कधी महागात पडू शकतं. सोशल मीडियावर फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टी करताना सावध असलंच पाहिजे. (bank customer care)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्हाला तुमच्या बँकेचा ग्राहक तक्रार क्रमांक हवा असेल आणि तो तुम्ही गुगलवर सर्च करत असाल तर सावधान. कारण यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. गुगलवर नंबर शोधून त्यावर तुम्ही फोन करता आणि समोरचा व्यक्ती तुमची सर्व माहिती घेऊन तुमचं सर्व अकाऊंट खाली करु शकतो. त्यामुळे हे तुम्हाला महागात पडू शकतं.


बँकेसंदर्भात कोणतीही अडचण असल्यास थेट बँकेत जावूनच त्याबाबत बँक अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे. बँक देखील कधीही तुम्हाला कोणत्याही माहितीसाठी फोन करत नाही. त्यामुळे तुम्हाला बँकेतून बोलत आहे असा कॉल जरी आला तरी अशा कॉल्सपासून सावध राहिलं पाहिजे. 


कस्टमर केअरला फोन करताना नंबर पडताळून घेतला पाहिजे. शिवाय कोणतीही वैयक्तिक माहिती नाही सांगितली पाहिजे. तुमचा एटीएम कार्ड क्रमांक किंवा ओटीपी विचारला तर तो कधीच सांगू नये. यामुळे तुमच्या खात्यातील पैसे गायब होऊ शकतात.


सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट शोधताना काळजी घेतली पाहिजे. कारण आता फसवणूकीचे प्रमाणं वाढत आहे. सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने जागृत असलंच पाहिजे आणि इतरांना ही जागृत केले पाहिजे. जेणेकरुन अशा घटनांना आळा घालता येईल.