इंटरनेट आल्यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत मात्र जितका फायदा आहे तेवढचं  नुकसानदेखील आहे सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे जवळपास सगळ्या गोष्टी शक्य होऊ लागल्या आहेत पण याचा वापर नीट सांभाळून केला नाही तर मात्र याचा मोठा फटका आपल्याला बसू शकतो. 
इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर क्राईमच्या घटनादेखील वाढू लागल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करत असाल तर सांभाळून सावधगिरी बाळगत करा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमची एक चूक आणि सर्व पैसे गायब
 
तुमची एक चूक तुम्हाला कंगाल बनवू शकते तुमचा बँक बॅलन्स पूर्णपणे झिरो होऊ शकतो . 


फ्रॉड नंतर मिळवू शकता पैसे परत 


तुमच्यासोबत जर ऑनलाईन फ्रॉड झाला असेल तर आता काळजी करू नका तुमचे गेलेले पैसे तुम्ही परत मिळवू शकता.काही पर्याय आहेत जे वापरून तुम्ही गेलेले पैसे बँक खात्यात पुन्हा जमा करू शकता यासाठी गृहमंत्रालयाने पुढाकार घेतलाय आणि काही ऑप्शन्स आपल्याला दिले आहेत.  


गृहमंत्रालयाकडून हेल्पलाईन 


सायबर फ्रॉडंच प्रमाण वाढू लागलं आहे आणि यावर उपाय म्हणून गृहमंत्रालयाने पावलं उचलायला सुरवात केली आहे आणि यासाठी एक हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध करण्यात आला आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमची कम्प्लेंट करू शकता.  


कुठे आणि कधी करावी तक्रार 


जर तुमच्यासोबत कधी ऑनलाईन फ्रॉड झाला असेल तर लगेचच 155260 या क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता.यामुळे तुमचे गेलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतील त्याचशिवाय ज्याने कुणी हा फ्रॉड केलेला आहे त्याच्यावर कारवाईसुद्धा केली जाईल. 
हा हेल्पलाईन क्रमांक म्हणजे एक वर्चुअल पोलीस स्टेशनचं असणार आहे जेव्हा या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल कराल तेव्हा तुमच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तुम्ही याना सांगायचा आहे. तक्रार केल्यानंतर फ्रॉड केलेल्या व्यक्तीचं बँक अकाऊंट फ्रीझ केलं जाईल याचा अर्थ असा कि तो गुन्हेगार खात्यातून पैसे काढू शकणार नाही किंवा जमादेखील करू शकणार नाही 


त्यामुळे जर तुमच्यासोबत काही घडलं असेल तर त्वरित या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार करा कदाचित तुमचे गेलेले पैसे मिळू हि शकतील