मुंबई : Top Investment Ideas: नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये शेअर बाजारात चांगलीच तेजी पाहायला मिळाली. निफ्टी पुन्हा एकदा 18000 च्या वर बंद झाला. अल्पावधीत, बाजारात थोडीशी घसरण दिसू शकते. जागतिक संकेत अजूनही संमिश्र आहेत. देशांतर्गत कोणतेही मजबूत सकारात्मक ट्रिगर नाही. अशा स्थितीत काही दिवस बाजारात स्टॉक स्पेसिफिक ऍक्शन दिसू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शॉर्ट टर्म गुंतवणूकीसाठी तसेच 1 महिन्यासाठी मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील, तर असे काही शेअर्स आहेत ज्यांचे फंडामेंटल्स मजबूत आहेत.  या शेअर्रमध्ये  3 ते 4 आठवड्यांत चांगली वाढ होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये Indiabulls Real Estate Limited, Uttam Sugar Mills Limited, Redington (India) Limited आणि NBCC (India) Limited यांचा समावेश आहे. या शेअर्समधील संभाव्य तेजीचा तुम्ही फायदा घेऊ शकता.


Indiabulls Real Estate
CMP: 167 रुपये
बॉय रेंज: 166-163 रुपये
स्टॉप लॉस: 156 रुपये
रिटर्न्स: 10%-15%


शेअरने साप्ताहिक चार्टवर तेजी दर्शवली आहे. हे येत्या काळात शेअर तेजीत असण्याचे सकारात्मक संकेत आहेत.  शेअरमध्ये 236-257 रुपयांपर्यंतची आणखी तेजीची शक्यता आहे.


Redington (India) Limited
CMP: 163 रुपये
बॉय रेंज: 162-158 रुपये
स्टॉप लॉस: 147 रुपये
रिटर्न्स: 16%-22%


वेगवेगळ्या इंडिकेटरवर शेअरमध्ये येत्या दिवसात चांगली ऍक्शन दिसू शकते. शेअर आणखी 185-195 रुपयांपर्यंत वाढू शकतो.


NBCC (India) Limited
CMP: 50 रुपये
बॉय रेंज: 48-46 रुपये
स्टॉप लॉस: 43 रुपये
रिटर्न्स: 17%-28%
 शेअरसाठी अनेक इंडिकेटर तेजीचे संकेत देत आहेत. शेअरने स्थिर रेज मधून ब्रेकआऊट दिला आहे त्यामुळे.शेअरमध्ये 55-60 रुपयांपर्यंतची तेजी येत्या महिन्यात दिसू शकते