Dr Reddys कडून कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी Redyxऔषध
मागील अनेक महिन्यापासून कोरोनावर इलाज करण्यासाठी डेक्सोमेथासोन, फेपिरावीर, कोरोवीरसारख्या औषधी वापरण्यात येत .
मुंबई : भारताची नामांकित फार्मा कंपनी डॉ. रेड्डीज लॅबने कोरोना व्हायरसचं औषध बाजारात आणलं आहे. मागील अनेक महिन्यापासून कोरोनावर इलाज करण्यासाठी डेक्सोमेथासोन, फेपिरावीर, कोरोवीरसारख्या औषधी वापरण्यात येत होत्या. यावर कोरोना रूग्णाची प्रकृती वेगाने सुधारण्यास मदत होत असल्याचा दावा केला जातो.
भारतात कोरोनातून बरं होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आता डॉ. रेड्डीजने भारतीय बाजारात 'Redyx' नावाने रेमडिसिविर आणली आहे. हा औषधानेही रूग्ण लवकर बरा होण्याचा कंपनीचा दावा आहे.
कंपनीने यासाठी Gilead Sciences लायसेसिंग करार केलेला आहे. करारानुसार डॉ. रेड्डीज भारतासह 127 देशांमध्ये रेमडिसिवीरचं उत्पादन करतील आणि विकतील. रेनडिसिवीरला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून मान्यता मिळालेली आहे.
डॉ. रेड्डीजची Redyx 100 mg ही वायलमध्ये उपलब्ध असेल. डॉ.रेड्डीजचे सीईओ एमव्हीएमव्ही रमन्ना म्हणतात, आम्ही अशा प्रकारच्या औषधी विकसित करणे सुरूच ठेवू, ज्यामुळे रूग्ण लवकरात लवकर बरे होतील.
डॉ.रेड्डीजने मागील महिन्यात प्रयोगशाळेत कोव्हिड-19 चं औषध एविगन (Avigan) लॉन्च केलं होतं. या औषधाचा वापर कोरोनाचे पहिल्या टप्प्यातील, म्हणजे ज्यांना नुकतीच लागण झाली आहे किंवा सौम्य लक्षणं ज्या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. या औषधाच्या गोळीची किंमत 99 रूपये आहे.