Jammu Blast : दुहेरी स्फोटानं हादरलं जम्मू विमानतळ; वायुदलाचे 2 कर्मचारी जखमी
दुसरा स्फोट विमानतळाच्या मोकळ्या जागेत झालाय
मुंबई : जम्मूच्या विमानतळावर पाच मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट झालेत. या हल्ल्यासाठी ड्रोन वापरल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. या स्फोटात वायुदलाचे दोन कर्मचारी जखमी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. रात्री पावणे दोनच्या सुमाराला हे स्फोट झालेत. (Drones were used to carry out blasts inside Jammu IAF station) पहिल्या स्फोटात छपराचं नुकसान झालं आहे
दुसरा स्फोट विमानतळाच्या मोकळ्या जागेत झालाय. हा विमानतळ वायुदलाच्या ताब्यात आहे. तो सिव्हिलियन वापरासाठी वापरला जातो. या स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी सुरू झालीय. वायुदलाचे उपप्रमुखही जम्मूला जाण्याची माहिती मिळत आहे. लडाख दौ-यावर असलेले संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी या स्फोटांची माहिती घेतलीय.
जम्मू विमानतळाच्या टेक्निकल एरियात 2 स्फोट झाले आहेत. या हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
स्फोटात वायुदलाचे दोन कर्मचारी जखमी झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. पहिल्या स्फोटात टेक्निकल एरियाच्या छपराचं नुकसान झालं आहे.
5 मिनिटांच्या अंतराने विमानतळावर दोन स्फोट झाले आहेत.