ऑक्टोबर महिन्यात 8 दिवस Dry Day
असा असणार ऑक्टोबर महिना
मुंबई : ऑक्टोबर महिना हा सुट्यांसाठी खास असणार आहे तसाच तो तळीरामांसाठी देखील महत्वाचा असणार आहे. कारण या दिवशी एक-दोन नव्हे तब्बल 8 वेळा ड्राय डे असणार आहे. ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या सणांमुळे तसेच विधानसभा निवडणुकांमुळे संपूर्ण राज्यात आठ दिवस ड्राय डे पाळण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसह संपूर्ण राज्यात ड्राय डे असणार आहे.
सणांमुळे तीन दिवस हा ड्राय डे असणार आहे. तर 17 राज्यांमध्ये तीनपेक्षा अधिक दिवस हा ड्राय डे असणार आहे. निवडणुकींच्या काळातही दारू बंदी असल्यामुळे या ड्राय डेमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्राबरोबरच हरयाणा , अरूणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड, आसाम, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, मध्यप्रदेश, मेघालय, ओडिसा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये देखील निवडणुका असल्यामुळे ड्राय डे असणार आहे.
निवडणुकांबरोबरच 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती आहे.. 8 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. 13 ऑक्टोबर रोजी वाल्मिकी जयंती आणि 28 ऑक्टोबर रोजी दिवाळी असल्यामुळे या 4 दिवशी देखील ड्राय डे असणार आहे.
तर या व्यतिरिक्त 4 दिवस ड्राय डे महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये विधानसभा निवडणूक असल्यामुळे ड्राय डे असणार आहे. 19 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 नंतर ड्राय डे लागू होणार असून 20 ऑक्टोबर आणि 21 ऑक्टोबर रोजी पूर्ण दिवस ड्राय डे असणार आहे. 21 ऑक्टोबरला निवडणूक असल्यामुळे हा ड्राय डे आहे. तर 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणीचा दिवस असल्यामुळे ड्राय डे असणार आहे.
पाहा संपूर्ण यादी
दिवस |
कारण |
2 ऑक्टोबर |
महात्मा गांधी जयंती |
8 ऑक्टोबर |
दसरा |
13 ऑक्टोबर |
वाल्मिकी जयंती |
19 ऑक्टोबर |
संध्याकाळी 6 नंतर (निवडणुकीच्या अगोदर 48 तास) |
20 ऑक्टोबर |
निवडणुकीच्या अगोदर 48 तास |
21 ऑक्टोबर |
निवडणुकीचा दिवस |
24 ऑक्टोबर |
मतमोजणीचा दिवस |
28 ऑक्टोबर |
दिवाळी |