नवी दिल्ली : मध्यरात्री लागू होत असलेल्या जीएसटीमुळे तुमच्या स्वप्नातलं घर महाग होण्याची भीती व्यक्त होतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारनं बांधकामाधीन घरांवर १८ टक्के जीएसटी लागू करण्याची अधिसूचना काढलीय. सध्याच्या कर आकारणीपेक्षा हा कर जवळपास तिप्पट आहे.  त्यामुळे कितीही नाही म्हटलं, तर घरं महागणार हे निश्चित आहे. 


तर दुसरीकडे पेट्रोल आणि मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचे नुकसान होणार असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. उद्यापासून देशभरात वस्तू आणि सेवा कर लागू होतोय. यानिमित्त गडकरी झी 24 तासशी बोलत होते. त्यामुळे त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. विविध वस्तू आणि सेवांचे चार स्तर करण्यात आले असून त्याला शून्य ते 18 टक्के कर लागणार आहे. 


मात्र यातून पेट्रोल-डिझेल आणि दारूला वगळण्यात आलंय. मात्र आगामी काळात हा निर्णय बदलला जाऊ शकतो, असे संकेतही गडकरींनी दिलेत.