बंगलुरू : प्रवाशांनी केलेल्या मस्करीमुळे मेट्रोला याचा चांगलाच फटका बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेट्रोला प्रवाशांमुळे 35 लाखाचा मोठा फटका बसला आहे. बंगलुरू मेट्रोने जाहिर केलेल्या माहितीनुसार प्रवाशांना माहित आहे की, मेट्रोच्या टोकनचा कुणीही काहीही वापर करत नाही. त्यामुळे मस्करी मस्करीमध्ये प्रवाशांनी चक्क हे टोकनच लंपास केले आहेत. 


टोकन चोरी ही गेले 7 वर्षात होत असल्यामुळे मेट्रोचे 35 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. याची माहिती आरटीआयच्या अंतर्गत समोर आली आहे. आरटीआयमार्फत मिळालेल्या माहितीनुसार बंगलुरू मेट्रो 2011 ते आतापर्यंत 10,739 प्रवाशांचे टोकन गायब झाले आहेत. आतापर्यंत दंडाच्या अंतर्गत 8,62,328 रुपये जमा केले आहेत. बंगलुरू मेट्रोला 1,67,320 टोकनचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. 


आपल्याला माहितच आहे देशभरात मेट्रो सेवा अनेक शहरात पसरली आहे. या मेट्रोची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) च्या खांद्यावर आहेत. तसेच मुंबईत देखील मेट्रोला चांगली पसंती मिळाली आहे. आता बंगुलरूप्रमाणे मुंबईतही अशी चोरी झाली आहे का याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.