मुंबई : आपल्या लग्नात प्रत्येत गोष्ट ठरल्या प्रमाणे आणि चांगली व्हावी असे सगळ्याच जोडप्याला वाटत असतं, त्यासाठी ते फार आधी पासून तयारी करत असतात. पूर्वी लग्नात वधू-वर मोठे ठरवतील तसं आणि त्यापद्धतीने सगळं काही होऊ द्यायचे, परंतु आताचा जमाना बदलला आहे, ज्यामुळे वधू आणि वर दोघे स्वत: आपल्या लग्नाची तयारी करतात आणि आपल्याला काय करायचं आहे हे ठरवतात. सध्या तर लग्नात ग्रॅन्ड एन्ट्री करण्याचा ट्रेंड सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नातील ग्रॅन्ड एन्ट्रीचे भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असताता. ते पाहून प्रत्येकाला असं वाटत असतं की, आपण देखील आपल्या लग्नात असंच काहीसं करावं आणि त्याप्रमाणे ते सगळं ठरवतात. परंतु एका जोडप्याच्या बाबतीत काहीसं वेगळं घडलं आहे, जे पाहून तुम्हाला हसु आवरणार नाही.


या लग्नात नवरदेवाने स्टेजवर एन्ट्री करताना वधू सोबत असं काहीतरी केलं, जे वधूसाठी लाजिरवाण ठरलं. नवऱ्याला सगळ्यांसमोर असं काहीतरी करायचं होतं, ज्यामुळे हा क्षण प्रत्येकजण लक्षात ठेवेल.


परंतु त्यासाठी त्याने जे काही केलंय, त्यानंतर तर लोकं आणखी त्याला लक्षात ठेवतील. परंतु यामुळे वधूची मात्र भरमंडपात चेष्टा झाली. आम्ही असं का म्हणतोय हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहूण लक्षात येईल.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नवरदेव स्टेजवर उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर वधू स्टेज खाली एका क्रेटवर उभी असते. तेव्हा नवरदेव नववधूचा हात धरुन उभा असतो, तो नववधूला खेचून स्टेजवरती एन्ट्री करणार असतो. परंतु तसं न घडता उलटं नववधू तोंडावरती पडते.


वधूची ही अवस्था पाहून मागे उभ्या असलेल्या लोकांना खूप आश्चर्य वाटले. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. एका यूजरने लिहिले की, 'वधू स्टेजवर चढत असताना तिने लक्ष दिले पाहिजे होते.' तर दुसऱ्या एका युजर ने कमेंट केलं की, 'जोरात खेचण्याऐवजी तिला आरामात वर आणायला पाहिजे होतं.' सोशल मीडियावर लोक या व्हिडीओला खूप पसंत करत आहेत.


मीम ऑफ भूतनी नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. इतर अनेक वापरकर्त्यांनी देखील या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली.