नवी दिल्ली : देशभरात पसरलेल्या कोरोना संकटामुळे आरबीआयने, बँकांना ग्राहकांकडून ईएमआय न घेण्याची घोषणा केली आहे. आरबीआयच्या या घोषणेनंतर बँकेचा ईएमआय न दिल्याने कोणताही चार्ज लागणार नाही. पण या सुविधेनंतर ही जर ईएमआय कापून गेला असेल तर ते पैसे पुन्हा मिळू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय स्टेट बँकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जर मार्च महिन्यातील ईएमआय बँकेकडून कापून गेला असेल तर तो पुन्हा मिळवता येऊ शकतो. हा EMI पुन्हा मिळवण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही.  EMI पुन्हा मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.


- सर्वात आधी बँकेला तुमचा  EMI कापून गेला असल्याची माहिती द्यावी लागेल. 
- एसबीआयमध्ये देण्यात आलेल्या मोराटोरियमच्या सुविधेनुसार, बँकेने एक फॉर्मेट तयार केला आहे. हा फॉर्मेट आधी डाऊनलोड करावा लागेल.
- त्यावर सही आणि फॉर्मेट कॉपी करुन स्कॅन करुन तो बँकेत पाठवावा लागेल.
- स्कॅन केल्यानंतर संबंधित बँकेला याबाबत मेल करावा लागेल. 
- मेल केल्यानंतर बँकेकडून सर्व माहिती चेक केली जाईल.
- त्यानंतर फॉर्मेटद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, बँकेने ज्या अकाऊंटमधून पैसे कापले असतील त्या संबंधित बँक अकाऊंटमध्ये ईएमआयचे पैसे परत दिले जातील.


सध्याच्या परिस्थितीत देशात सरकारी किंवा खासगी बँकेत ग्राहकांनी कमीत कमी जाण्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे बँकेकडून अनेक सुविधा ऑनालाईन देण्यात येत आहेत. पुढील तीन महिन्यापर्यंत कोणत्याही बँकेतील एटीएममधून पैसे काढल्यानंतर कोणताही चार्ज लावण्यात येणार नाही. डेबिडकार्ड धारक एटीएममधून कितीही वेळा पैसे काढू शकतो. त्यावर कोणताही चार्ज लावण्यात येणार नसल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.


तसंच, बँक खातेधारकांना, आपल्या खात्यात मिनिमम बॅलेन्स ठेवण्यााबाबतही सूट देण्यात आली आहे. आता बँक खातेधारकांना, खात्यात मिनिमम बँलेन्स ठेवण्याची गरज नाही. कोरोनाच्या व्हायरसच्या वाढत्या रुग्णांमध्ये अनेक शहरांत लॉकडाऊनची स्थिती आहे. अशात अनेक लोक घरातून बाहेर पडत नाही. त्यामुळे खातेधारक आता जवळच्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून विनाशुल्क पैसे काढू शकणार आहे.