मुंबई : सणासुदीच्या हंगामात अनेकजण सोन्याची खरेदी करतात. जगामध्ये डिजिटल क्रांती होण्याआधी सर्वजण पारंपारिक पद्धतीनेच भौतिक स्वरुपात सोनं खरेदी करत असतं. पण आता सोनं खरेदी करण्याची पद्धत बदलली आहे. डिजिटल काळात सोन्याची खरेदी देखील डिजिटल स्वरुपात करता येते. यामध्ये तुम्ही 24 कॅरेटचं शुद्ध सोनं देखील ऑनलाईन खरेदी करु शकता. पेटीएम, गूगल पे, फोनपे, MMTC यांसारख्या अनेक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून डिजिटल सोनं खरेदी करता येतं. आज आम्ही तुम्हाला डिजिटल गोल्ड (Digital Gold) खरेदी करण्याचे फायदे आणि तोटे यांबद्दल सांगणार आहोत.


डिजिटल सोने खरेदीचे फायदे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही अगदी एक रुपयाचंसुद्धा डिजिटल सोनं खरेदी करू शकता. त्यातसुद्धा 24 कॅरेटची शुद्धता असते. यामध्ये तुम्हाला सोनं सोबत ठेवण्याची किंवा साभाळण्याची गरज नसते. जर तुम्ही ते सोनं विकलं तर लगेच तुमच्या खात्यात पैसे येतात. डिजिटल सोन्याच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी असते.


डिजिटल गोल्डचे तोटे


डिजिटल सोन्याचेही काही तोटे देखील आहेत. डिजिटल सोन्यावर ३ टक्के जीएसटी लागतो. याचा अर्थ जर तुम्ही 10 हजार रुपयांचे सोने खरेदी केले तर तुमच्या खात्यात फक्त 9700 रुपयांचे सोने येईल. याशिवाय स्टोरेज, इन्शुरन्स आणि ट्रस्टी फी म्हणून 2-3 टक्के फी वजा केलं जातं. यासाठी रेगुलेटर नाहीये.


हाय लिक्विडिटी म्हणजे डिजिटल सोनं


डिजिटल सोन्याच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी आहे. याला कोलॅट्रल म्हणून वापरलं जाऊ शकतं. हे सोनं गहाण ठेवल्यास कर्ज सहज उपलब्ध होतं. डिजिटल सोन्याच्या खरेदीमुळे कागदोपत्री कामाचा त्रास नसतो.


मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत


गुंतवणुकीच्या मर्यादेबद्दल बोलायचं झाल्यास, एका प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त 2 लाख रुपये डिजिटल सोने ठेवता येतं. ते सुरक्षित आणि विमा उतरवलेल्या व्हॉल्टमध्ये ठेवलेले असल्याने, अनेक प्लॅटफॉर्मवर स्टोरेज वेळ मर्यादा देखील आहे. एकंदरीत, प्रत्यक्ष सोन्यापेक्षा गुंतवणूक करणं सोप्प आहे आणि याची लिक्विडिटी जास्त आहे.