नवी दिल्ली : कुटुंबातील सदस्यांची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) यांनी आपल्या ठेवीदारांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) द्वारे ई-नामांकन दाखल करण्यास सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Twitter वर EPFO ​​ने म्हटले की, "तुमच्या कुटुंबासाठी/नॉमिनीसाठी #SocialSecurity सुनिश्चित करण्यासाठी UAN द्वारे आजच ऑनलाइन ई-नामांकन दाखल करा."


EPFO ने नमूद केले आहे की पात्र कुटुंबातील सदस्यांना PF, पेन्शन आणि कर्मचारी ठेव-लिंक्ड विमा योजना (EDLI) च्या ऑनलाईन पेमेंटसाठी 7 लाख रुपयांपर्यंत ई-नामांकन महत्त्वपूर्ण आहे. ईपीएफओने म्हटले आहे की नॉमिनेशन केव्हाही अपडेट केले जाऊ शकतात, परंतु लग्नानंतर ते आवश्यक आहे.


EPFO ​​ने सांगितले की, यासाठी सेल्फ डिक्लरेशन पुरेसे आहे, ​​नियोक्त्याकडून कोणत्याही कागदपत्रांची किंवा मंजुरीची आवश्यकता नाही.


UAN ने ई-नॉमिनेशन (EPFO E-Nomination Process)
 
सर्वात आधी EPFO वेबसाईट उघडा (https://epfindia.gov.in/)


नंतर Services निवडा आणि "For Employees" वर क्लिक करा.


यानंतर Member UAN/Online Service (OCS/OTCP) निवडा.


तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.


मॅनेज टॅबवर जा आणि चौथा पर्याय निवडा - e-Nomination.


तुमच्या स्क्रीनवर "Provide Details" टॅब दिसेल. Save पर्यायावर क्लिक करा.


कौटुंबिक माहिती देण्यासाठी YES वर क्लिक करा, त्यानंतर "Add Family Details" वर क्लिक करा जिथे तुम्ही एक किंवा एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडू शकता.


यानंतर Save EPF/EDLI Nomination वर क्लिक करा


वन-टाइम पासवर्ड (OTP) साठी ‘ई-साइन’ वर क्लिक करा आणि तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर हा ओटीपी येईल.


ईपीएफओ सदस्यांना ईपीएफ आणि ईपीएस नॉमिनी ऑनलाईन बदलण्याची परवानगी आहे. “ईपीएफ सदस्य विद्यमान ईपीएफ/ईपीएस नामांकन बदलण्यासाठी नवीन नामांकन दाखल करू शकतात,” ईपीएफओने 21 फेब्रुवारी रोजी याबाबत ट्विट केले होते.