बापरे! गरुड चक्क चिमुकल्याची शिकार करणार होता पण...; हृदयाचे ठोके चुकवणारा हा Video पाहिलात का?
Eagle Attack Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक गरुड मुलासह उडणार अन् तेवढ्यात...हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहिलीय का?
Eagle Attack Video : सोशल मीडियावर एक अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये गरुडने एका मुलाला शिकारासाठी लक्ष्य केलायच दिसतंय. हा व्हिडीओ पाहून हृदयाचे ठोके काही क्षणासाठी चुकतात. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ? पक्ष्यांमध्ये गरुड हा सर्वात धोकादायक आणि शक्तिशाली शिकारी आहे. असं म्हणतात की, त्याच्या पंखात एवढी शक्ती असते की तो सर्वात मोठी शिकारही सहज उचलू शकतो आणि आकाशात उडू शकतो. गरुड त्याच्या मजबूत पंखांच्या जोरावर कोणत्याही आणि मोठ्या प्राण्याची सहज शिकार करु शकतो. या गरुडाने लहान मुलालाही आपल शिकाराच लक्ष्य केल्याचा या व्हिडीओमध्ये पाहिला मिळतंय.
सोशल मीडियाचा मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'X' वर '@inderjeetbarak' या हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आणि त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या बाजूला एका कालव्या काठी लहान मुला उबा आहे. तेवढ्यात हिरवगार झाड्यांमधून एक मोठा गरुड वेगाने मुलाची शिकार करायला येतो. तो गरुड आपली शिकार करणार आहे, याची कुठलीही कल्पना त्या चिमुकल्याला नव्हती. तो कालव्या शेजारी उभा राहून पाण्याकडे बघत होता. तो गरुड त्या मुलाची शिकार करण्यासाठी झेपावला अन् मग...
गरुडची झेप पाहून अंगावर काटा येतो. तो गरुड त्या मुलाची शिकार करणार तेवढ्यात एक माणसाची नजर त्या मुलावर गेली आणि त्याने क्षणाचाही वेळ न दवडता त्या मुलाला उचलून घेत आणि बाजूला धावला. त्या व्यक्तीच्या चाणक्यामुळे त्या निरागस मुलाचे प्राण त्या गरुडाच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. ही घटना दूर कुठूनतरी कोणीतरी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. जर तो व्यक्ती तिथे आला नसता तर त्या मुलाच काय झालं असतं ते विचार करुनच सुन्न व्हायला होतं.
या व्हिडीओ शेअर करताना त्याला कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की, 'गरुड मुलासह उडणार होता तेव्हा अचानक...' हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो पाहून सर्वजण आश्चर्यचकित होत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला 1.8 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटिझन्स कमेंट्समध्ये त्या व्यक्तीच्या हुशारीचे कौतुक करत आहे. ज्याने वेगाने त्या व्यक्तीने गरुडाचाही पराभव केला ते कौतुकास्पद आहे.'