Business Ideas: तुम्ही नोकरी तसेच काही न करता पैसे कमवू शकता. (Earn Money) तुम्हीही कमाईचा पर्याय शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या घराचे छत आणि टेरेस हे कमाईचे साधन होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला एक काम करावे लागेल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बिझनेसबद्दल  (Business) सांगणार आहोत, बहुतेक लोकांच्या घराचे छप्पर आणि टेरेस खाली राहते, त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही याद्वारे मोठी कमाई करु शकता. (Business News in Marathi)


होर्डिंग्जच्या माध्यमातून कमाई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमचे घर जर मुख्य रस्त्यावर असेल तर तुम्ही तुमच्या छतावर किंवा इमारत टेरेसवर होर्डिंग्ज लावू शकता. यातूनही तुम्ही कमाई चांगली करु शकता. होर्डिंगचे भाडे मालमत्तेच्या स्थानाच्या आधारावर ठरवले जाते. यासाठी तुम्ही आऊटडोर जाहिरात कंपन्यांशी संपर्क साधू शकता. याच्यामाध्यमातून चांगली कमाई करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. 


मोबाईल टॉवर बसवून पैसे कमवा 


याशिवाय तुम्ही तुमच्या छतावर किंवा टेरेसवर मोबाईल कंपनीचे टॉवर लावून पैसे कमवू शकता. मोबाईल टॉवर बसवणाऱ्या कंपन्या यासाठी चांगले पैसे देतात. जर तुम्हाला तुमच्या छतावर टॉवर बसवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक काम करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टीफिकेट घ्यावे लागेल. हे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मोबाईल टॉवरमधून चांगले पैसे मिळू शकतात.


सोलर प्लांटच्या माध्यमातूनही कमाई


सोलर प्लांटमधून चांगली कमाई करु शकता. तुम्ही सोलर प्लांट घराच्या छतावर बसवू शकता आणि यातून चांगले पैसे कमवू शकता. यामुळे वीज तर निर्माण होतेच, शिवाय बिल भरण्यापासूनही दिलासा मिळतो. सोलर प्लांटच्यामाध्यमातून वीज निर्माण करून आणि ती विकून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. वीज कंपन्यांसोबत वीज खरेदी करार केल्यानंतर तुमच्या घरी मीटर बसवले जाईल. या मीटरवरून तुम्ही किती वीज विकली हे कळेल. या व्यवसायासाठी सुमारे 80,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.