Earn Money Idea: तुमच्याकडे आहे का या नंबरची नोट? घरबसल्या व्हा लखपती, जाणून घ्या...
नोकरी सांभाळून तुम्हाला घरी बसल्या अतिरिक्त पैसे कमवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी
Earn Money Idea: नोकरी सांभाळून तुम्हाला घरी बसल्या अतिरिक्त पैसे कमवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. त्यासाठी तुमच्याकडे 1, 5, 10, 20, 50 ,100 किंवा 2000 रुपयांच्या 786 क्रमांकाच्या नोटा असतील तर तुम्ही घर बसल्या रातोरात लखपती होऊ शकता. या नोटांच्या संग्रहातून कशी कमाई कराल हे जाणून घेऊया.
जुन्या नोटांचा संग्रह
अनेक जणांना जुनी किंवा अनोखी नाणी (Unique coins) जमा करण्याचा छंद असतो. पण हाच छंद तुम्हाला लाखो रुपये कमवूनही देऊ शकतो आणि तेही कोणत्याही मेहनतीशिवाय. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास नोटांबद्दल सांगणार आहोत, ज्यातून तुम्ही लाखो रुपयांची कमाई करु शकता. जर तुमच्याकडे 786 क्रमांकाची एखादी नोट असेल तर तुम्ही ती ई-बे (Ebay) वेबसाइटवर विकू शकता. या वेबसाइटवर तुम्ही आपल्या जवळच्या जुन्या नोटा किंवा नाणी विकू शकता.
786 नंबर आहे खास
786 हा नंबर विशेष मानला जातो. इस्लाम धर्मात या नंबरला विशेष महत्त्व असून मुस्लिम धर्मीय याला पवित्र मानतात. पण 786 हा नंबर केवळ मुस्लिम धर्मातच नाही तर अनेक जाती-समुदयातील लोकं याला भाग्यवान मानतात.
कशी विकू शकता नोट
- 786 नंबरची नोट तुमच्याजवळ आहे आणि ती तुम्हाला विकायची असले तर सर्वात आधी तुम्ही www.ebay.com या लिंकवर क्लिक करा
- आता होमपेजवर तुमचं लॉगिन रजिस्टर करा
- आता तुमच्या जवळच्या नोटचा एक चांगला आणि स्पष्ट फोटो या साईटवर अपलोड करा
- यानंतर Ebay तुम्ही अपलोड केलेला फोटो त्या लोकांपर्यंत पोहोचवतो ज्या लोकांना जून्या नोटा किंवा नाणी विकत घेण्याचा छंद आहे आणि जी लोकं या प्लॅटफॉर्मचा वापर करतात.
- आता ज्यांना ही जुनी नोट खरेदी करण्यात रस आहे ते तुमच्याशी संपर्क साधतील
- त्यानंतर तुम्ही खरेदी करणाऱ्या व्यक्तीशी वाटाघाटी करु शकता
- योग्य किंमत मिळाल्यानंतर तुम्ही ती नोट त्या व्यक्तीला विकू शकता
त्यामुळे तुमच्याकडे जर 786 क्रमांकाची नोट असेल तर तुम्हीही घरबसल्या लखपती बनू शकता. Ebay वेबसाईटवर तुम्ही लॉगिन करुन 786 नंबरच्या 5, 10, 20, 50, 100, 200, 500, 2000 क्रमांकाच्या नोटा विकू शकता. Ebay वेबसाईटवर मोजक्याच नोटांचा लिलाव होतो. इथे तुमच्या नोटांवर बोली लावली जाते. यात तुम्हीही भाग घेऊ शकता. अशात जर तुमच्याकडे 786 नंबरची नोट असेल तर तुम्हाला चांगली किंमत मिळू शकते. आतापर्यंत अशा नोटेवर 3 लाख रुपयांपर्यंत बोली लागली आहे.