Earning Oppurtunity: नोकरी करताना आपण कायमच आपल्या पैशांचा गुणाकार कसा होईल याचा विचार करायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे म्यूचल फंड सारखे पर्याय आपण शोधत असतो. ज्यात आपल्या कमाईचा थोडा भाग आपण सेव्हिंग्स म्हणून एसआयपीसारख्या सुविधांमध्ये गुंतवणूक (Investment) करण्याचा विचार करतो. कोणत्या म्यूचल फंडमध्ये आपण किती आणि कसं सेव्हिंग करू शकतो याचा विचार आपण करतो. तेव्हा आपण जाणून घेऊया या नव्या फंडबद्दल ज्यातून आपण चांगला फायदा मिळवू शकतो. (earning Opportunity three new funds opened from today you can start investing with 5000)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही आता ज्या कंपनीबद्दल बोलणार आहोत ती एक फार मोठी कंपनी आहे. या कंपनीचे नाव आहे एडलवाईस अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड (Edelweiss Asset Management Limited). ही एक म्यूचअल फंड कंपनी आहे. ही कंपनी लवकरच इक्विटी फंड्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. एनएफओ एडलवाईस निफ्टी मिडकॅप 150 मोमेंटम 50 इंडेक्स फंड (NFO Edelweiss Nifty Midcap 150 Momentum 50 Index Fund), निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड (Nifty Next 50 Index Fund) आणि निफ्टी स्मॉलकॅप 250 इंडेक्स फंड (Nifty Small Cap 250 Index Fund) असे या फंड्सची नावं आहेत. तुम्ही या फंड्सचे सदस्यत्व 10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2022 पर्यंत घेऊ शकता. या योजनेतून तुम्ही किमान 5000 रूपयांची गुंतवणूक करू शकता. या योजनेत लॉक-इन नाही. म्हणजेच ही ओपन एंडेड स्कीन आहे. गुंतवणूकदार त्यांना पाहिजे तेव्हा पैसे काढू शकतात. 


हेही वाचा - दिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यार्थी आनंदाने शाळेत गेले, पण वर्गात शिरताच हादरले... नेमकं घडलं तरी काय


5000 रूपयांपासून होऊ शकते गुंतवणूक : 


या कंपनीच्या तीनही फंड्समध्ये आपण 5000 रूपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या इंडेक्स फंडांद्वारे (Index Fund) कोणीही कमी किमतीच्या मल्टी-कॅप पोर्टफोलियो तयार करू शकता. गुंतवणूकदारांच्या गरजा पुर्ण करण्याचे कंपनीचे ध्येय असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले. 


मिडकॅप स्पेसचा समावेश : 


हेही वाचा : गुळ खाणाऱ्यांसाठी कडू बातमी... आता मोजावे लागणार अधिकचे पैसे?


निफ्टी मिडकॅप 150 मोमेंटम 50 इंडेक्स फंड हा मिडकॅप स्पेससाठी चांगला पर्याय आहे. तर निफ्टी स्मॉलकॅप (Small Cap) 250 इंडेक्स फंड हा पर्याय भरघोस आणि घसघशीत पर्याय असू शकतो. या दोन योजनांचा फायदा असा आहे की कुठलाही गुंतवणूकदार कॉम्बो ऐलोकेशनद्वारे सर्व क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कमी किमतीच्या  पर्यायांचा आणि मार्केट कॅपचा (Market Cap) उत्तम प्रकारे लाभ घेऊ शकता.