मुंबई : आपल्यातील बर्‍याच जणांना आपली पृथ्वी अवकाशातून कशी दिसत असेल? हा विचार पडलाच असेलच आणि तुम्हाली ते पाहायची इच्छा देखील असणार, आपली पृथ्वी अंतराळातून खूप सुंदर दिसते. 'अर्थ डे' च्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरून (ISS) घेतलेला हा व्हिडीओ तुम्हाला खूप आवडेल. ISSने हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. तो पाहिल्यावर तुम्हाला त्याला पुन्हा पुन्हा पाहाण्याची इच्छा होईल. (Video of High definition views of Earth from International Space Station)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ISS ने पृथ्वी दिन (Earth Day) साजरा करताना हा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रत्येक वर्षी 22 एप्रिल रोजी पृथ्वी दिन (Earth Day) साजरा केला जातो. आतापर्यंत 53 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ISSने लिहिले आहे की, 'आरामात बसा आणि दृश्याचा आनंद घ्या!' तसेच पुढे असे लिहिले आहे की, 'या #EarthDay साठी आम्ही आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरून पृथ्वीचे हाय डेफिनिशन व्हिडीओ शेअर करत आहोत. आम्ही जास्त काही सांगणार नाही, हा व्हिडीओ पहा आणि आश्चर्यचकित होण्यास तयार राहा.'


हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला


आतापर्यंत 53 हजाराहून अधिक लोकांना हा व्हिडीओ आवडला आहे. हा व्हिडीओ अगदी नासाच्या अधिकृत पेजवरुन देखील लाईक केला गेला आहे. या व्हिडीओचा आनंद घेण्याबरोबरच लोकं त्यांचे अनुभवही सांगत आहेत. एका इन्स्टाग्राम यूझर्सने लिहिले आहे की, आमची अद्भुत धरती माता!' तर दुसर्‍याने लिहिले, 'शानदार, काय दृश्य आहे.' याशिवाय हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.



अलीकडेच, इलोन मस्कची कंपनी स्पेसएक्सने (SpaceX) प्रथमच रिसायकल केलेल्या रॉकेट आणि अंतराळयानाचा वापर करून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनसाठी तिसऱ्या क्रू ला लाँच केले. त्याअंतर्गत अमेरिका, फ्रान्स आणि जपानमधील चार अंतराळवीर आयएसएसकडे येत आहेत. क्रू लॉन्चमधून वेळ घालवताना सदस्यांचा व्हिडीओ आयएसएसने शेअर केला आहे. आयएसएसने सांगितले की, हे क्रू मेंबर वेळेपूर्वीच अवकाशात दाखल झाले होते. त्यामुळे त्यांच्याकडे थोडा वेळ होता, म्हणून मग ते स्टोन, पेपर, सीझर हा गेम खेळत होते. हा व्हिडीओ देखील 1.2 लाखापेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.