Earthquake in Bay of Bengal : बापरे! बंगालच्या उपसागरात भूकंप; त्सुनामी येणार?
Earthquake in Bay of Bengal : नेपाळमागोमाग बंगालच्या उपसागरात भूकंपाचे हादरे. पाहा कुठे रहोतं. भूकंपाचं केंद्र आणि किती होती त्याची तीव्रता...
Earthquake in Bay of Bengal : भारतासह जगभरात गेल्या काही काळापासून सातत्यानं काही अशा घटना घडल्या ज्यामुळं अनेकांचीच चिंता वाढली. काही दिवसांपूर्वीच नेपाळमध्ये आलेल्या अतिप्रचंड भूकंपामध्ये शेकडो बळी गेले. तत्पूर्वी तुर्की आणि अफगाणिस्तानमधील भूकंपानंही मोठी जीवित आणि वित्त हानी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यात आता आणखी एका संकटाची भर पडली आहे. कारण, मंगळवारी सकाळी (7 ऑक्टोबर) बंगालच्या उपसागरात भूकंपाचे हादरे जाणवल्याची माहिती समोर आली आहे.
पहाटे 5 वाजून 32 मिनिटांनी भूकंपाचे हादरे जाणवले. नेशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये 10 किमी खोलीवर या भूकंपाचं केंद्र होतं. तर, भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल इतकी होती. अंदमान आणि निकोबार बेटांपासून दूर झालेल्या या भूकंपामध्ये सध्या तरी कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. शिवाय बंगालच्या उपसागरात आलेल्या या भूकंपानंतर आता सदरील यंत्रणा पुढील घडामोडींवर लक्ष ठेवत असून, तूर्तास त्सुनामी किंवा तत्सम इशारा देण्यात आलेला नाही.
उत्तराखंडमध्येही भूकंपाचे हादरे...
नेपाळमध्ये शुक्रवारी आलेल्या भूकंपानंतर भारतातील काही भागांमध्येही याचे परिणाम पाहायला मिळाले. जिथं उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे सौम्य हादरे जाणवल्याचं पाहायला मिळालं. यामागोमाग सोमवारीसुद्धा भारतातील काही राज्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली.
हेसुद्धा वाचा : Weather Update : मान्सूनमागोमाग थंडीही देतेय चकवा; राज्याच्या 'या' भागात ऐन हिवाळ्यात पावसाचा इशारा
उत्तराखंडच्या पिथोरागढ येथे सोमवारी 5.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला. यामध्ये कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. ज्याची कंपनं धारचूला, दिदिहाट आणि बंगापानी भागामध्ये जाणवली होती.
नेपाळमधील भूकंपाची दहशत
नेपाळमध्ये शुक्रवारी जाजरकोट येथे आलेल्या प्रचंड तीव्रतेच्या भूकंपानं 153 हून अधिकांचा बळी घेतला तर, या आपत्तीमध्ये जखमींची संख्याही मोठी होती. उभ्या इमारती भूकंपामध्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळल्या. हा भूकंपत इतका मोठा होता की राजधानी काठमांडूपर्यंतही हादरे जाणवले. नेपाळमध्ये सातत्यानं जाणवणाऱ्या धरणीकंपांमुळं आता नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.