नवी दिल्ली : दिल्लीत पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गेल्या २४ तासात दुसऱ्यांदा दिल्लीत भूकंपाचे धक्का जाणवले. या भूकंपांची तीव्रता रिक्टर स्केलमध्ये २.७ इतकी होती. सोमवारी दुपारी १.२६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचं केंद्र दिल्लीत आहे. रविवारी ३.५ रिक्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी नोएडा, दिल्ली, गाझियाबादसह आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास हे भूकंपाचे हे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर अनेक जण घराबाहेर आले होते. भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याची माहिती अजून आलेली नाही. रविवारी आलेल्या भूकंपाचं केंद्र जमिनीपासून आठ किमी खाली होते. यामुळे हा धक्का इतका जोरदार होता की, लॉकडाऊन दरम्यान ही लोकांना घराबाहेर पडावं लागलं होतं.


मागच्या वर्षी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास या भागात भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यावेळी भूकंपाचे केंद्रबिंदू भारत-पाकिस्तान सीमेवर होते. त्या भूंकपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ३.३ इतकी होती.