Earthquake in Delhi: दिल्ली आणि परिसर मंगळवारी रात्री उशिरा भूकंपाच्या जोरदार धक्क्याने हादरला. राजधानी दिल्ली मध्यरात्री भूकंपाने हादरल्याने भीतीचे वातावरण दिसून आले. रात्री 1 वाजून 57 मिनिटांनी भूकंपाचे जोरदार धक्के बसलेत. त्याची तीव्रत्ता रिस्टर स्केलवर 6.3 इतकी होती. दिल्ली-NCRसह उत्तर प्रदेश, बिहार, मणिपूरमध्ये भूकंपाचे धक्के बसलेत. तर नेपाळमध्ये एका पाठोपाठ एक असे तीन भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळच्या डोटीमध्ये घर कोसळून 6 जण ठार झाल्याची माहिती समोर आलीय. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये असल्याचं भूकंपशास्त्र विभागानं स्पष्ट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. या भूकंपाच्या धक्क्याने नेपाळमध्ये घर कोसळून काही जण अडकलेत. यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा आलेल्या या भूकंपानंतर लोक घाबरुन घराबाहेर आले आणि उभे राहिले. भूकंपानंतर धक्का जोरदार बसल्यामुळे लोकही चिंतेत होते. लखनऊ आणि दिल्लीला सुमारे 5.7 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले. रात्री झोपलेल्या लोकांचे पलंग आणि छताचे पंखे अचानक हलू लागले. त्यानंतर भीतीचे वातावरण पसरले. लोक फोनवरुन एकमेकांची काळजी विचारीत होते.


नेपाळ, चीनमध्येही भूकंपाचे धक्के


 मिळालेल्या माहितीनुसार, 6.3 रिश्टर स्केलच्या या भूकंपाचा सर्वाधिक फटका नेपाळमध्ये बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेपाळ, भारताशिवाय चीनमध्येही भूकंपाचे धक्के लोकांना जाणवले. नेपाळ आणि मणिपूरमध्ये दुपारी 1.57 वाजताच्या दरम्यान 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची खोली जमिनीखाली 10 किमी होती. 


नेपाळमध्ये 5 तासात 3 वेळा भूकंप



नेपाळमध्ये जोरदार हादरा बसला आहे. गेल्या 24 तासांत भूकंपाचे तीन धक्के बसले आहेत. पहिला रात्री 8.52 वाजता आला, ज्याची तीव्रता 4.9  रिश्टर स्केल इतकी होती. दुसरा 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप रात्री 9.41 वाजता झाला. यानंतर रात्री उशिरा 1 वाजून 57 मिनिटांनी तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के बसले. नेपाळमध्ये 2.12 वाजता आणखी एक भूकंप झाला, डोटी जिल्ह्यात एक घर कोसळले, 3 जणांचा मृत्यू झाला. यापूर्वी गेल्या 24 तासांत 5 रिश्टर स्केलपेक्षा कमी तीव्रतेचे भूकंप झाले आहेत, ज्याचा केंद्रबिंदू नेपाळ आणि मिझोराम आहे. दिल्ली भूकंपाच्या झोन 4 मध्ये आहे. इथे पाचच्या वरचा भूकंप इमारतींसाठी धोकादायक मानला जातो. रात्री उशिरा झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.3  रिश्टर स्केल इतकी होती.