Earthquake in Delhi-NCR: दिल्ली-एनसीआरपासून जम्मू-कश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के; पाकिस्तान आणि चीनलाही फटका
Earthquake in Delhi NCR: दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi NCR) मंगळवारी दुपारी भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले आहेत. याशिवाय जम्मू काश्मीर आणि चंदीगडमध्येही धक्के बसले आहेत.
Earthquake in Delhi NCR: दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi NCR) मंगळवारी दुपारी भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले आहेत. याशिवाय जम्मू काश्मीर आणि चंदीगडमध्येही धक्के बसले आहेत. फक्त भारतच नाही तर पाकिस्तान आणि चीनमध्येही भूकंप आला आहे. भूकंपाची तीव्रता 5.7 रिश्टर स्केल इतकी होती. दुपारी 1 वाजून 13 मिनिटांनी हे धक्के जाणवले आहेत.
जम्मू काश्मीरमधील किश्तवाडपासून 30 किमी दक्षिण पूर्वेला भूकंपाचं मुख्य केंद्र असल्याची माहिती भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. या भूकंपाची तीव्रता 5.7 रिश्टर स्केल इतकी होती.
दरम्यान, भूकंपाचे हादरे बसल्यानंतर दिल्ली-एनसीआरमध्ये लोकांची धावपळ सुरु झाली होती. घर, ऑफिसमध्ये असणारे अनेकजण जीव वाचवण्यासाठी मोकळ्या परिसरात पोहोचले होते. ट्विरला काहींना घरातील पंखे हालतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. तर काहींनी कार्यालयात काय स्थिती होती हे दाखवलं आहे.
मार्चमध्येही जाणवले होते भूकंपाचे धक्के
याआधी मार्च महिन्यात भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता 6.6 रिश्टर स्केल होती. भूकंपाचा परिणाम दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश आणि उत्तराखंसह संपूर्ण उत्तर भारतात जाणवला होता. अफगाणिस्तानमधील हिंदू कुश या भूकंपाचे मुख्य केंद्र होतं.
मे महिन्यात भारतात 41 वेळा भूकंप
NSC च्या डेटानुसार, भारतात 1 मे ते 31 मे पर्यंत 31 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले, यामधील 7 भूकंप उत्तराखंड आणि 6 भूकंप मणिपूरमध्ये आले होते. याशिवाय अरुणाचल प्रदेशात 5 वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. तसंच हरियाणा आणि मेघालयात 3 वेळा भूकंप आला होता.