गुवाहाटी : आसामच्या तेजपूरमध्ये भूकंपाचे सलग काही झटके जाणवले आहेत. बुधवारी सकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवण्यात आले. या भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे झटके अरुणाचल प्रदेशापर्यंत जाणवले गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, आसामच्या तेजपूर जवळ पहिला झटका 7 वाजून 51 मिनिटांपर्यंत पोहचला आहे. तेजपूरपासून 43 किलोमीटर पश्चिमेला जमिनीच्या 17 किलोमीटर खाली भूकंपाचे केंद्र होते. त्यानंतर लगेचच काही मिनिटात भूकंपाचे आणखी धक्के जाणवले.


भूकंपाचा धक्का इतका होता की, परिसरातील भिंतींना तडे गेले आहेत. अनेक घरांचे छत उडाले आहेत. अद्यापतरी या भूकंपामुळे जीवितहानी झालेली नाही.



भूकंपाबाबत आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटले की, 'आसामच्या तेजपूर परिसरात आलेला भूकंप मोठा आहे. सर्व नागरिक सुरक्षित असतील अशी प्रार्थना आहे. नागरिकांना अलर्ट राहण्याची अपिल मी करतोय. पुढील सविस्तर माहिती मी अधिकाऱ्यांकडून घेत आहे'