भारत-चीन सीमेवर भूकंपाचे धक्के
...
नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सीमाभागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मंगळवारी पहाटे ५.१५ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये काही वेळ घबराट पसरली. या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाची खोली जमिनीपासून सुमारे १० किलोमीटरवर होती. या भूकंपानंतर अद्याप कुठेही जिवीत किंवा वित्त हाणी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाहीये.
भारत आणि चीनच्या सीमेवर जाणलेल्या भूकंपाची तिव्रता ४.५ रिश्टर स्केल होती. या तिव्रतेच्या भूकंपाने बसणाऱ्या हादराने घरांच्या खिडक्या तुटण्याची शक्यता असते. तसेच, घरांच्या भिंतींनाही भेगा पडण्याची शक्यता असते.