बिकानेर : राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्याला भूकंपाचे पुन्हा धक्के जाणवले आहेत. आज सकाळी 7 वाजून 42 मिनिटांनी 4.8 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जिल्ह्याला जाणवले. National Center for Seismology ने ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी पावणे आठच्या दरम्यान राजस्थानातील बिकानेर जिल्ह्याला भूकंपाचे धक्के जाणवले. कालसुद्धा बिकानेरच्या काही परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. सलग दोन दिवस जाणवलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.



भूकंप का होतो?
पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत असतात. जेथे या प्लेट्स अधिक टक्कर घेतात, त्या झोनला फॉल्ट लाइन म्हणतात. वारंवार होणाऱ्या टक्करांमुळे प्लेट्सचे कोपरे वाकलेले असतात. जेव्हा जास्त दाब वाढतो आणि प्लेट्स तुटतात. त्याचवेळी खाली ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधते. मग यानंतर भूकंप होतो