नवी दिल्ली : दिल्ली एनसीआरमध्ये ​रविवारी भूकंपाचे झटके जाणवले. हा भूकंप किती तिव्रतेचा होता याबाबत अजून कोणताही माहिती समोर आलेली नाही. यामध्ये कोणतीही जीवीत किंवा मालमत्ता नुकसानीची माहिती अजून समोर आलेली नाही. 



उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना भूंकपाचे झटके अधिक जोरात जाणवले. यानंतर भीतीने अनेक जण घराबाहेर पडले. दिल्ली भूकंपासाठी अतिसंवेदनशिल मानलं जातं. घरातील पंखे आणि इतर वस्तू अचानक हलू लागल्याने भूंकपाचे झटके जाणवले.