या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा
सर्व राज्यांची मतमोजणी एकत्रितपणे ११ डिसेंबरला पार पडेल.
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची तारीख शनिवारी जाहीर करण्यात आली. निवडणूक आयोगाने दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
त्यानुसार, मध्यप्रदेश व मिझोराममध्ये २८ नोव्हेंबर आणि राजस्थान व तेलंगणात ७ डिसेंबर रोजी मतदान पार पडेल. तर छत्तीसढमध्ये पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त असलेल्या १८ विधानसभा मतदारसंघात १२ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. उर्वरित ७२ मतदारसंघात २० नोव्हेंबरला मतदान होईल. त्यानंतर सर्व राज्यांची मतमोजणी एकत्रितपणे ११ डिसेंबरला पार पडेल, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. या सर्व राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.