नवी दिल्ली : जेट एअरवेजचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष नरेश गोयल यांच्या मुंबईतील घरावर सक्तवसूली संचनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. गोयल यांच्या मुंबई आणि दिल्लीतील अनेक ठिकाणांवर धाड टाकण्यात आली. ईडीच्या या कारवाई नंतर गोयल मनी लॉंड्रींग प्रकरणात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फेमा कायद्या अंतर्गत गोयल यांच्या ठिकाणांची चौकशी केली जात असल्याचे ईडीने म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठ्या आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्या जेट एअरवेजचे कार्य १७ एप्रिलपासून बंद आहे. कॉर्पोरेट प्रकरणातील मंत्रालयातील तपासामध्ये कंपनीतर्फे आर्थिक व्यवहार समोर आल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर अडवत परदेशी जाण्यापासून रोखले होते. ते दोघे लंडनसाठी निघाले होते. विमान कंपनी जेटवर बॅंकांचे ११ हजार कोटींचे कर्ज आहे. जेट एअरवेज विरोधात टॅक्स चोरी प्रकरणाची देखील चौकशी सुरु आहे.


जेटलींना कोठडी 


माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणासोबतच आणखी चार प्रकरणांत सक्तवसुली संचालनालयाने त्यांची चौकशी सुरू  केली आहे. तसेच सीबीआयने न्यायालयाकडे पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे.